News Flash

Video : वाघा बॉर्डरवर पाकिस्तानी बॉलरचं चिथावणीखोर कृत्य, बीएसएफचा संताप

मैदानावर गडी बाद केल्यानंतर ज्या प्रकारे अली आनंद साजरा करतो त्याचप्रमाणे तो भारतीयांकडे पाहून इशारे करत होता. 

वाघा बॉर्डरजवळ एका पाकिस्तानी क्रिकेटपटूने केलेल्या चिथावणीखोर कृत्यामुळे सीमा सुरक्षा दलाचे जवान चांगलेच संतापले आहेत. भारताकडून पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या कृत्याबाबत आक्षेप नोंदवण्यात आला आहे. नेहमीप्रमाणे वाघा बॉर्डरवर ध्वज उतरवण्याचा सोहळा (फ्लॅग डाउन परेड सेरेमनी) सुरू असताना पाकिस्तानच्या क्रिकेट टीमचा वेगवान गोलंदाज हसन अली याने बीएसएफच्या जवानांकडे आणि भारतीयांकडे पाहून इशारे केले.

21 एप्रिल रोजी पाकिस्तान क्रिकेट टिमचे काही खेळाडू ध्वज उतरवण्याचा सोहळा पाहण्यास आले होते. या दरम्यान, भारत आणि पाकिस्तानचे जवान परेड करत असतानाच हसन अली पाकिस्तानी सैनिकांच्या मधोमध जाऊऩ उभा राहिला. पाकिस्तानचे जवान परेडमध्ये जे काही करत होते तसंच कृत्य हसन अली भारतीयांकडे पाहून करत होता, पण आश्चर्य म्हणजे यावेळी पाकिस्तानच्या लष्करानेही त्याला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. मैदानावर गडी बाद केल्यानंतर ज्या प्रकारे अली आनंद साजरा करतो त्याचप्रमाणे तो भारतीयांकडे पाहून इशारे करत होता. बीएसएफने पाकिस्तानच्या क्रिकेटपटूच्या या कृत्यावर नाराजी जाहीर केली आहे. प्रोटोकॉलनुसार सेरेमनीमध्ये केवळ जवानच सहभागी होऊ शकतात, सामान्य व्यक्तीला सहभागी होता येत नाही असं बीएसएफने म्हटलं आहे. याबाबत पाकिस्तानी रेंजर्सला फोन करुन विरोध दर्शवण्यात आला आहे अशी माहिती बीएसएफचे अधिकारी मुकुल गोयल यांनी इंडियन एक्सप्रेसला दिली.

हसन अलीचा हा चिथावणीखोर व्हिडीओ क्रिकेटबाबत बातम्या देणारी वेबसाइट क्रिकइन्फोने शेअर केला आहे. पाकिस्तानचं वृत्तपत्र ‘डॉन’हा व्हिडीओ आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला असून मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ –

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2018 10:55 am

Web Title: pakistan cricketer pacer hassan ali takes his field antics to wagah border bsf not amused
Next Stories
1 परोपकाराची जाण! जीवदान देणा-याला रोज भेटायला येते ही घार
2 फेकन्युज : प्रकाशराज यांनी ट्विट केलेली ‘ती’ छायाचित्रे जुनीच!
3 जाणून घ्या तुमच्या मोबाईल अॅपची युनिक फिचर
Just Now!
X