06 July 2020

News Flash

पाक उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्याची बांगलादेशकडून हकालपट्टी

बांगलादेशने देश सोडण्यास सांगितलेला पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकारी आर्थिक दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याचा आरोप निराधार असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.

| February 6, 2015 02:02 am

बांगलादेशने देश सोडण्यास सांगितलेला पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकारी आर्थिक दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याचा आरोप निराधार असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.
ढाक्यातील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात काम करणारा मोहम्मद मझहर खान हा भारतीय चलनातील बनावट नोटा बाजारात आणण्याच्या कामाला अर्थसाहाय्य करण्यासह बनावट चलन तयार करण्यात गुंतलेला असल्याचा अहवाल बांगलादेशच्या गुप्तचर संस्थांनी दिल्यानंतर, पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांच्या सरकारने या कर्मचाऱ्याला हटवावे, असे पाकिस्तानला सांगितले होते. संबंधित अधिकारी पाकिस्तानला परतल्याच्या वृत्ताला विदेश विभागाच्या सचिव तस्नीम अहमद यांनी दुजोरा दिला. या अधिकाऱ्याची हकालपट्टी दुर्दैवी असून, त्याच्याविरुद्धचे सर्व आरोप निराधार आहेत, असे त्या म्हणाल्या.
या घटनेमुळे ढाक्यातील पाकिस्तानी उच्चायुक्तालय केवळ दबावाखालीच नसून, बांगलादेशी गुप्तचर संस्था त्याच्या कारवायांवर बारीक लक्ष ठेवून असल्याचे वृत्त ‘डॉन’ या वृत्तपत्राने दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2015 2:02 am

Web Title: pakistan dismisses charges against hc staffer in bangladesh
टॅग Bangladesh,Pakistan
Next Stories
1 काश्मीर मुद्दा ही पाकिस्तानची ‘दुखरी नस’
2 ‘इसिस’ दहशतवाद्यांच्या प्रभावक्षेत्रात जॉर्डनचे हवाई हल्ले
3 शारदा घोटाळ्याच्या सीबीआय तपासावरील देखरेखीची विनंती फेटाळली
Just Now!
X