पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी याने पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरबाबत विधान केलं आहे. इंग्लंडमध्ये एका कार्यक्रमात काश्मीर प्रश्नाबाबत बोलताना आफ्रिदीने पाकिस्तानचेच कान टोचले आहेत.

पाकिस्तानला काश्मीरबाबत काळजी करण्याची गरज नाही, पाकिस्तानकडून चार प्रांत सांभाळले जात नाहीयेत, त्यामुळे पाकिस्तानने काश्मीरबाबत चिंता करु नये, असं आफ्रिदी म्हणाला. सोशल मीडियावर आफ्रिदीच्या पत्रकार परिषदेचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. यामध्ये ‘काश्मीर हा काही मुद्दा नाहीये, पाकिस्तानलाही काश्मीर नकोय…त्यांच्याकडून तर तेथील जनताच सांभाळली जात नाही. काश्मीर भारतालाही देऊ नका… मी म्हणतो काश्मीरला स्वतंत्र राहुद्या…माणुसकी मोठी गोष्ट आहे. ज्या लोकांचा तेथे मृत्यू होतोय…ते कोणत्याही धर्माचे असोत…माणूस म्हणून दुःख होतं…किमान माणुसकी तरी जिवंत राहुद्या’ असं बोलताना आफ्रिदी दिसत आहे. ‘शाहीद आफ्रिदी फाउंडेशन’शी निगडीत एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आफ्रिदी येथे आला होता अशी माहिती आहे.


blockquote class=”twitter-tweet” data-lang=”en”>

Delighted to have engaged with Parliament and the UK Student body, sharing my vision and hopes for @SAFoundationN. A special thanks to @uclupaksoc for helping pull this together #HopeNotOut https://t.co/kG0KwbWPeg

— Shahid Afridi (@SAfridiOfficial) November 13, 2018


काश्मीरबाबत विधान करण्याची आफ्रिदीची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वी त्याने काश्मीर प्रश्नावरुन भारताला लक्ष्य केलं होतं. याच वर्षी एप्रिल महिन्यात एक ट्विट करुन त्याने भारतीय लष्कराने खात्मा केलेल्या 13 दहशतवाद्यांच्या मृत्यूबाबत शोबक व्यक्त केला होता. संयुक्त राष्ट्राने यामध्ये हस्तक्षेप करावा असंही त्याने ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरसह अन्य राजकीय नेत्यांनी आफ्रिदीवर टीकेचा भडीमार केला होता.