12 July 2020

News Flash

परराष्ट्र धोरणासंबंधी मोदींचे विधान उत्साहवर्धक

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमदेवार नरेंद्र मोदी यांनी परराष्र्ट् धोरणाबद्दल केलेले मतप्रदर्शन पाकिस्तानच्या दृष्टीने उत्साहवर्धक असून, लवकरच पाकिस्तानशी सौहार्दतेचे संबंध प्रस्थापित करणारे आणि शांततामय सहजीवनास चालना देणारे

| April 25, 2014 04:01 am

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमदेवार नरेंद्र मोदी यांनी परराष्र्ट् धोरणाबद्दल केलेले मतप्रदर्शन पाकिस्तानच्या दृष्टीने उत्साहवर्धक असून, लवकरच पाकिस्तानशी सौहार्दतेचे संबंध प्रस्थापित करणारे आणि शांततामय सहजीवनास चालना देणारे स्थिर सरकार भारतात येईल, असे कौतुकोद्गार पाकिस्तानच्या उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी काढले. मोदींच्या या धोरणांमुळे पाकिस्तान भारताशी व्यापक आणि दृढ संबंध प्रस्थापित करू शकेल, अशी आशाही पाकिस्तानी उच्चायुक्तांनी व्यक्त केली.
भारताशी पुन्हा संवाद प्रक्रिया सुरू व्हावी अशीच आमचीही इच्छा आहे. उभय देशांमधील मतभेदाच्या मुद्यांचे निराकरण करण्यासाठी संवाद हाच एकमेव मार्ग आहे, मात्र सध्या कोणतेही राष्ट्र संवाद प्रक्रिया सुरू करण्यासाठी पुढाकार घेताना दिसत नाही. त्यामुळे संवाद खोळंबला आहे. मात्र, भारताने संवाद प्रक्रिया सुरू केली तर उभय देशांमध्ये सहसंबंध निर्माण करणे सुलभ होईल, असेही बसित यांनी सांगितले.
मोदीविरोधकांनी पाकिस्तानात जावे, असे वक्तव्य एका भाजप नेत्याने केले आहे, याबाबत बसित यांना विचारले असता, या विधानाबाबत काहीही माहीत नसल्याचे ते म्हणाले. विधान नेमके काय आहे, हे जाणून घेईन आणि त्यानंतर प्रतिक्रिया देईन, असे बसित म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2014 4:01 am

Web Title: pakistan encouraged by narendra modis foreign policy
टॅग Pakistan
Next Stories
1 नौदल उपप्रमुखपदी सुनील लांबा?
2 पाकिस्तानमध्ये १२ दहशतवादी ठार
3 निवडणुकीतील माध्यमांच्या वार्तांकनाबद्दल शरद पवारांना शंका
Just Now!
X