04 June 2020

News Flash

पाकिस्तान रेंजर्सकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन

जम्मू जिल्ह्य़ातील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तान रेंजर्सनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची पुन्हा एकदा आगळीक केली

| August 2, 2015 03:15 am

जम्मू जिल्ह्य़ातील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तान रेंजर्सनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची पुन्हा एकदा आगळीक केली. छोटय़ा शस्त्रांनी गोळीबार करून तोफांचा माराही केला त्याला सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.
पाकिस्तानच्या रेंजर्सनी या वेळी सीमा सुरक्षा दलाच्या तीन ठाण्यांना लक्ष्य केले होते. अखनूर क्षेत्रात सकाळी ११ वाजण्याच्या सुमाराला पाकिस्तान रेंजर्सनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची आगळीक केली.
पाकिस्तानला सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. जवळपास एक तास ही धुमश्चक्री सुरू होती. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी अथवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही, असे सीमा सुरक्षा दलाच्या प्रवक्त्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2015 3:15 am

Web Title: pakistan open fire against india
टॅग Fire,Pakistan
Next Stories
1 ‘मॅगी परत आणणे हेच प्राधान्य’
2 विमान अपघातात लादेनचे कुटुंबीय ठार
3 आंध्र प्रदेश सरकारकडून ग्रामीण भागासाठी दोन लाख घरे मंजूर
Just Now!
X