25 March 2019

News Flash

पाकिस्तानमध्ये रेल्वेचा भीषण अपघात, ६ ठार तर १०० हून अधिक प्रवासी जखमी

मालगाडीच्या खाली एक व्यकी आल्याने मालगाडी थांबविण्यात आली होती.

पाकिस्तानमधील मुलतानमध्ये मालगाडी आणि एक्सप्रेस यांच्यात भीषण अपघात झाला आहे.  या दुर्घटनेत सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर १५० प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. पेशावरहून कराचीला जात असणाऱ्या आवाम एक्स्पेस शेर शहा परिसरातील बुच्छ रेल्वे स्थानकावर थांबलेल्या  मालगाडीला धडक दिली. मालगाडीच्या खाली एक व्यकी आल्याने मालगाडी थांबविण्यात आली होती. त्याचवेळी आवाम एक्सप्रेस पेशावरहून कराचीच्या दिशेने धावत होती. या भीषण अपघातातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामधील १० जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते आहे.

First Published on September 15, 2016 12:39 pm

Web Title: pakistan train accident i least six dead and 150 injured