News Flash

हत्या प्रकरणात माजी अध्यक्ष मुशर्रफ दोषमुक्त

पाकिस्तानचे माजी लष्करशाह व अध्यक्ष परवेझ मुशर्रफ व इतर दोन जणांना दोषमुक्त केले आहे.

| January 19, 2016 02:19 am

पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ (संग्रहित छायाचित्र)

बलुचिस्तानचे राष्ट्रवादी नेते नवाब अकबर खान बुगटी यांच्या हत्येप्रकरणी दहशतवाद विरोधी न्यायालयाने पाकिस्तानचे माजी लष्करशाह व अध्यक्ष परवेझ मुशर्रफ व इतर दोन जणांना दोषमुक्त केले आहे.
बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टा येथील न्यायालयाने माजी अध्यक्ष मुशर्रफ यांची सुटका करतानाच राज्याचे माजी गृहमंत्री मीर शोएब नोशेरवानी व कौमी वतन पार्टी प्रमुख अफताब अहमद खान शेरपाव यांनाही दोषमुक्त ठरवण्यात आले आहे. न्या. जनमहंमद गोहर यांनी निकाल जाहीर केल्यानंतर बुगटी यांचे पुत्र जमील बुगटी व सोहेल रजपूत यांच्या वकिलांनी या निकालावर आव्हान देण्याचे जाहीर केले असे ‘डॉन’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
रजपूत यांनी सांगितले, की आरोपींना दोषी ठरवणे आवश्यक होते. आम्ही या निकालावर समाधानी नाही, त्यामुळे निकालास आव्हान देणार आहोत. जानेवारी २०१५ मध्ये मुशर्रफ यांच्यावर या प्रकरणी आरोपपत्र ठेवण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2016 2:19 am

Web Title: pakistans ex president musharraf acquitted in murder case
टॅग : Pervez Musharraf
Next Stories
1 तालिबानच्या मुद्दय़ावर काबूलमध्ये चर्चेची दुसरी फेरी सुरू
2 करुणानिधींविरुद्धच्या खटल्याची सुनावणी लांबणीवर
3 आंतरखंडीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाबाबत अमेरिकेचे इराणवर नव्याने र्निबध
Just Now!
X