News Flash

‘फाळणी आणि बाबरी पतनानंतर गेल्या वर्षभरात भारतीय समाजाचे सर्वाधिक धुव्रीकरण’

भारतीय समाजाचे ध्रुवीकरण झाले आहे हे आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे

chidambaram : विद्यापीठात केवळ विद्वत्तापूर्ण वर्णन झालेच पाहिजे, असे काही नाही. मी त्याठिकाणी हास्यास्पदही वागू शकतो, असे चिदंबरम यांनी म्हटले.

देशाची फाळणी आणि बाबरी मशिदीच्या पतनानंतर भारतीय समाजाचे कधी नव्हे इतके ध्रुवीकरण गेल्या वर्षभरात झाल्याचे सांगत माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. ते शुक्रवारी दिल्लीत त्यांच्या ‘अ इयर इन अपोझिशन’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. भारतीय समाजाचे ध्रुवीकरण झाले आहे हे आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे. तुमच्या मुस्लिम आणि दलित मित्रांशी एकदा बोला. जमिनीचे लहान तुकडे असणाऱ्या शेतकऱ्यांशी बोला. या लोकांशी संवाद साधल्यानंतर तुम्हाला कळेल की, देशातील गरीब आणि अल्पसंख्याक जनतेमध्ये किती असुरक्षितता आणि भीतीचे वातावरण आहे. आपण सध्या प्रचंड फूट पडलेल्या आणि ध्रुवीकरण झालेल्या सामाजिक परिस्थितीकडे वाटचाल करत असल्याचे चिदंबरम यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी जेएनयू प्रकरणासंदर्भात स्मृती इराणी यांनी संसदेत दिलेल्या स्पष्टीकरणावरही भाष्य केले. विद्यापीठ म्हणजे तुम्हाला काय वाटते. विद्यापीठ म्हणजे काही बालवाडी नव्हे. विद्यापीठ ही अशी जागा आहे की जिथे विद्यार्थी म्हणून मला चुकीचे वागण्याचा हक्क आहे. विद्यापीठात केवळ विद्वत्तापूर्ण वर्णन झालेच पाहिजे, असे काही नाही. मी त्याठिकाणी हास्यास्पदही वागू शकतो, असे चिदंबरम यांनी म्हटले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2016 12:08 pm

Web Title: partition babri now our most polarised years chidambaram
टॅग : Bjp,P Chidambaram
Next Stories
1 पाकिस्तानला एफ १६ विमाने देण्यास प्रतिबंध करण्याची मागणी
2 रामजन्मभूमी वादात सुब्रह्मण्यम स्वामी पक्षकार
3 अमेरिकेत हल्लेखोराचा बेछूट गोळीबार; तीन ठार
Just Now!
X