पठाणकोट हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून विविध ठिकाणी टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये काही संशयितांना अटक करण्यात आल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. पाकिस्तानच्या गुजरानवाला, झेलम आणि बहावलपूर या परिसरात हे छापे टाकण्यात आले. अटक करण्यात आलेल्यांचा पठाणकोट हल्ल्यात सहभाग असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा नोंदवून कारवाई सुरू केली जाईल, असेही सांगण्यात आले आहे.
गुरुदासपूर, पठाणकोटमध्ये सावधानतेचा इशारा
दरम्यान, या अटकेनंतर पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी गुप्तचर विभाग, आयएसआय, फेडरल तपास संस्था आणि स्थानिक पोलिसांचे संयुक्त तपास पथक नेमण्याचे आदेश दिले असून, पठाणकोट हल्ल्याचे पाकिस्तानातील धागेदोरे शोधून काढण्याचे काम सुरू झाले आहे. शरीफ यांनी याआधीच पठाणकोट हल्ल्याच्या तपासात पारदर्शकता राहिल याचे आश्वासन दिले आहे, तर भारतानेही पठाणकोट हवाई तळावरून हल्लेखोराकडून संपर्क साधण्यात आलेला पाकिस्तानी दुरध्वनी क्रमांक देखील पाककडे सुपूर्द करण्यात आला आहे.
शिष्टाईनंतरचा बाणा!