News Flash

पेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा वाढ

पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर २९ पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर ३४ पैसे वाढ करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : देशात या आठवड्यात इंधनाच्या दरात चौथ्यांदा वाढ करण्यात आल्याने शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात विक्रमी वाढ झाली. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर २९ पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर ३४ पैसे वाढ करण्यात आली आहे.
या दरवाढीमुळे दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर ९२.३४ रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर ८२.९५ रुपये इतका झाला आहे. महाराष्ट्रासह राजस्थान, मध्य प्रदेशातील काही शहरांमध्ये इंधनाच्या दराने अगोदरच शंभरी पार केली आहे. मुंबईत आता पेट्रोलचा दरप्रतिलिटर ९८.६५ रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर ९०.११ रुपये इतका झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2021 1:16 am

Web Title: petrol diesel price hike again akp 94
Next Stories
1 उत्तर प्रदेशात कारागृहात गोळीबार, ३ कैदी ठार
2 अमेरिका मुखपट्टीमुक्तीच्या दिशेने!
3 भारतात कोविशिल्ड मात्रांतील कालावधी वाढविण्याचा निर्णय योग्यच -फौची
Just Now!
X