News Flash

Petrol and Diesl price: पेट्रोल दरवाढीचे चटके कायम; डिझेल दोन महिन्यानंतर झालं स्वस्त

पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाच्या दरात पुन्हा वाढ मुंबईतील पेट्रोलचे दर १०७ रुपयांवर पोहोचले, तर डिझेलही शंभरीच्या उंबरठ्यावर...

fuel prices today,fuel prices in delhi,fuel prices in mumbai,fuel prices kolkata,fuel prices bhop,fuel prices chennai,petrol prices in bhopal,petrol prices in mumbai,diesel prices in delhi,diesel prices in mumbai,petrol prices chennai,petrol prices bengaluru
पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाच्या दरात पुन्हा वाढ मुंबईतील पेट्रोलचे दर १०७ रुपयांवर पोहोचले आहेत.

महागाईचा दाह सोसणाऱ्या सर्वसामान्यांना आता इंधन दरवाढीचेही चटके बसू लागले आहेत. देशात इंधनाचे दर गगनाला भिडले असून, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे नागरिकांच्या खिशालाही झळ बसू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर सातत्यानं वाढत आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यात पेट्रोलच्या दरांनी केव्हाच शंभरी ओलांडली असून, डिझेलही शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचलं आहे. सोमवारी तेल वितरक कंपन्यांनी पुन्हा पेट्रोलच्या दरात वाढ केल्याने पेट्रोलच्या किंमतींनी नवा उच्चांक गाठला.

रविवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दरात कोणताही बदल झाला नाही. तर शनिवारी (१० जुलै) पेट्रोलच्या दरात ३५ पैसे आणि डिझेलच्या दरात २६ पैशांची वाढ करण्यात आली होती. एका दिवसाच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. मात्र, डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. तब्बल दोन महिन्यांनंतर पहिल्यांदाच डिझेलच्या दरात कपात करण्यात आल्याने दरात लिटरमागे घसरण झाली आहे. पेट्रोलच्या दरात २७ पैशांची वाढ झाली आहे. तर डिझेल १६ पैशांनी स्वस्त झाले आहे.

पेट्रोलच्या दरात २७ पैसे वाढ झाल्यामुळे मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर १०७.२० म्हणजे १०८ रुपयांवर जाऊन पोहोचलं आहे. तर कपात होऊनही डिझेलसाठी प्रतिलिटर ९७.२९ रुपये मोजावे लागत आहेत. मुंबईबरोबरच कोलकाता आणि दिल्लीतही इंधनाच्या दरांचा भडका उडाला आहे.

दिल्लीत पेट्रोलचे दर प्रतिलिटर १०१.१९ रुपये इतके असून, डिझेल प्रतिलिटर ८९.७२ रुपये आहे. भोपाळमध्ये पेट्रोल दर लिटरमागे १०९.५३ रुपये आहे. डिझेलही ९८.५० रुपयांवर पोहोचलं आहे. तर कोलकात्यात पेट्रोलसाठी लिटरमागे १०१.३५ रुपये मोजावे लागत आहेत. आजच्या दर कपातीने मुंबईतील डिझेलचा भाव ९७.२९ रुपये झाला आहे. रविवारी ९७.४६ रुपये इतका होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2021 10:20 am

Web Title: petrol prices update petrol prices rose diesel prices reduce fuel prices in mumbai bmh 90
टॅग : Petrol,Petrol Price
Next Stories
1 करोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दिग्विजय सिंह यांच्यासहित २०० जणांविरोधात FIR दाखल
2 Coronavirus: देशातला रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांहून अधिक, जाणून घ्या आकडेवारी!
3 उत्तर प्रदेश निवडणुकीआधी RSS कडून महत्त्वाचा बदल; कुमार यांच्याकडे संघ-भाजपा समन्वयाची जबाबदारी
Just Now!
X