करोनाच्या संकटानं मेटाकुटीला आलेल्या अमेरिकेत जॉर्ज फ्लाइड यांच्या मृत्यूनंतर प्रचंड हिंसाचार उफाळला आहे. अमेरिकनं नागरीक रस्त्यावर उतरत पोलिसांनी केलेल्या कृत्याविरोधात तीव्र रोष व्यक्त करत आहेत. त्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक विधान केलं होतं. त्यावरून ह्यूस्टनचे पोलीस दलाच्या प्रमुखांनी ट्रम्प यांना शांत बसण्याचा सल्ला दिला आहे. “जर तुमच्याकडं सांगण्यासारखं काही नसेल, तर गप्प बसा,” अशा शब्दात पोलीस अधिकाऱ्याने ट्रम्प यांना सुनावलं आहे.

मिनियापोलीस शहरात जॉर्ज फ्लॉइड या आफ्रिकन वंशाच्या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. जॉर्ज फ्लॉइड यांना अटक करताना पोलीस अधिकाऱ्यानं त्यांची मान गुडघ्यानं दाबून धरली होती. यात त्यांचा श्वास कोंडल्यानं मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल माध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर अमेरिकेत हिंसाचाराचा उद्रेक झाला.

आणखी वाचा- अमेरिकेच्या रस्त्यावर सैन्य तैनात करेन, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

उफाळून आलेल्या हिंसाचारावर बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत टीका केली होती. टेक्सॉस प्रातांतील मिनियापोलीस शहराच्या गव्हर्नरशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी बळाचा वापर करून हिंसाचार शांत करण्याचा सल्ला दिला होता. “तुम्ही आंदोलकांवर वर्चस्व मिळावायला हवं. तुम्ही असं करत नसाल, तर तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत आहात. ते तुमच्यावर धावून येणार आहेत. त्यामुळे तुम्ही वर्चस्व प्रस्थापित करायला हवं,”असं ट्रम्प म्हणाले होते. याचवेळी त्यांनी मिनियापोलीसमधील राष्ट्रीय सुरक्षा दलाचं कौतुक केलं होतं. “आंदोलकांना एखाद्या पावाच्या तुकड्यासारखं चिरडून टाकलं.” असं ते म्हणाले होते.

आणखी वाचा- ट्रम्प यांचा मार्ग मोकळा करण्यासाठी व्हाइट हाऊसजवळ पोलिसांनी झाडल्या रबरी गोळया

ट्रम्प यांनी दिलेल्या सल्ल्यानंतर ह्यूस्टन पोलीस प्रमुख आर्ट असीवेदो यांनी ट्रम्प यांना गप्प बसण्याचा सल्ला दिला आहे. सीएनएन या वृत्तवाहिनीशी बोलताना असीवेदो म्हणाले,”देशातील पोलीस प्रमुखांच्या वतीनं मला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हे सांगायचं आहे की, तुमच्याकडे बोलण्यासारखं काही नसेल, तर तोंड बंद ठेवा. हे वर्चस्व मिळवण्याकरीता नाही. हे लोकांचं अंतःकरण आणि मन जिकण्याविषयी आहे. मी हे ठामपणे सांगतोय की, दयाळूपणाला आम्ही कुमकुवतपणे सांगू इच्छित नाही. आम्ही जे जनजीवन पूर्वपदावर आणलं आहे. ते दुर्लक्षामुळे खराब करू इच्छित नाही,” असं म्हणत असीवेदो यांनी हॉलीवूडपटातील एका संवादाचा उल्लेख करत ट्रम्प यांना सल्ला दिला. “तुमच्याकडं बोलण्यासारखं काहीच नसेल, तर तोंड बंद ठेवा. कारण हेच नेतृत्त्वाचं मुख्य तत्त्व आहे. आम्हाला आताच्या नाहीतर पूर्वीच्या नेतृत्त्वाची गरज आहे आणि अध्यक्ष होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तसा होण्याचा प्रयत्न करू नये, कारण हा हॉलीवूडचा सिनेमा नाही. ही वास्तविक जीवन आहे व वास्तविक जीवनाता जोखीम आहे,” असं असीवेदो यांनी म्हटलं आहे.