08 August 2020

News Flash

राष्ट्रीय प्रतिज्ञाकारास अखेर न्याय!

भारताची राष्ट्रीय प्रतिज्ञा कुणी लिहिली असा प्रष्टद्धr(२२४)न विचारला तर ते कुणाला सांगता येणार नाही, काहींना ते गांधीजींनी लिहिली असे वाटत असेल पण ते खरे नाही

| July 4, 2015 04:13 am

भारताची राष्ट्रीय प्रतिज्ञा कुणी लिहिली असा प्रष्टद्धr(२२४)न विचारला तर ते कुणाला सांगता येणार नाही, काहींना ते गांधीजींनी लिहिली असे वाटत असेल पण ते खरे नाही. भारताची राष्ट्रीय प्रतिज्ञा तेलंगणातील नळगोंडा येथे जन्मलेले प्याडिमरी व्यंकटा सुब्बाराव यांनी लिहिली असून त्यांना आतापर्यंत या प्रतिज्ञेचे श्रेय मिळाले नव्हते पण आता तेलंगण सरकारच्या क्रमिक पाठय़पुस्तकात त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यात आला आहे. त्यांचे नाव भारताचे राष्ट्रीय प्रतिज्ञाकर्ते म्हणून देण्यात आले आहे.

भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत .. अशी ती प्रतिज्ञा शाळेतील मुले रोजच म्हणत असतात पण अनेकांना ती प्याडीमरी वेंकटा सुब्बाराव यांनी लिहिली आहे हे माहिती नसते. प्रतिज्ञेचे श्रेय आपल्या वडिलांना दिले पाहिजे, अशी मागणी सुब्बाराव यांचे पुत्र सुब्रह्मण्यम यांनी केली होती ती मान्य करण्यात आली आहे. त्यांना पद्मश्री देण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.
राष्ट्रीय प्रतिज्ञेचा इतिहास पाहिला, तर प्याडीमरी हे विशाखापट्टनम येथे १९६२ च्या चीन युद्धाच्या वेळी जिल्हा कोषागार अधिकारी असताना त्यांनी देशभक्ती जागवण्यासाठी ही प्रतिज्ञा लिहिली होती. नंतर स्वातंत्र्यसैनिक तेनेटी विश्वनाथम व आंध्रचे शिक्षणमंत्री पी.व्ही.जी राजू यांनी प्रतिज्ञा विशाखापट्टनम येथे पाठय़पुस्तकात समाविष्ट केली व नंतर ती देशपातळीवर गेली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2015 4:13 am

Web Title: pledge author lesson in telangana school books
टॅग Telangana
Next Stories
1 प्रत्येक तीनपैकी एक ग्रामीण कुटुंब भूमिहीन
2 कंदहार प्रकरणात तत्कालीन सरकारचा गोंधळ
3 दोन सहप्रवाशांचे फडणवीस यांच्या समर्थनार्थ ट्विट
Just Now!
X