News Flash

लढा करोनाशी! पीएम केअर फंडकडून ३१०० कोटींचं वाटप, स्थलांतरित मजुरांसाठी १००० कोटींची तरतूद

पंतप्रधान कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे

संग्रहित छायाचित्र

करोनाशी लढण्यासाठी पीएम केअर फंडकडून ३१०० कोटींचं वाटप करण्यात आलं आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये स्थलांतरित मजुरांसाठीही मोठी तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, स्थलांतरित मजुरांसाठी १००० कोटी खर्च केले जाणार आहेत. याशिवाय व्हेंटिलेटर खरेदी आणि लसनिर्मितीसाठी ही रक्कम वापरण्यात येणार आहे.

पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, करोनाशी लढा देण्यासाठी पीएम केअर फंडकडून ३१०० कोटींचं वाटप करण्यात आलं आहे. यामधील २००० कोटी रुपये व्हेटिलेटरची खरेदी करण्यासाठी वापरले जाणार आहे. तर १००० कोटी रुपये स्थलांतरित मजुरांची काळजी घेण्यासाठी वापरले जाणार आहे. तर उर्वरित १०० कोटी रुपये लसनिर्मिती करण्यासाठी खर्च करण्यात येणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाविरोधात लढण्यासाठी PM-Cares फंडची निर्मिती केली होती. यावेळी त्यांनी लोकांना पीएम केअर फंडसाठी मदत करण्याचं आवाहन केलं होतं. त्यांनी ट्विट करत सांगितलं होतं की, “देशभरातील लोकांनी करोनविरोधीत लढाईत मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ही भावना लक्षात घेता पीएम केअर फंडची निर्मिती केली आहे. निरोगी भारताची निर्माण करण्यात हे महत्त्वाची भूमिका बजावेल”.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 9:09 pm

Web Title: pm cares fund trust allocates 3100 crore for fight against coronavirus sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “तुमचं पॅकेज म्हणजे मोठं शून्य…”, मोदी सरकारवर संतापल्या ममता बॅनर्जी
2 आपण करोनासोबत जगण्याचं ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ शिकलं पाहिजे-गडकरी
3 बांधकाम उद्योगाला मिळणार मोठा दिलासा
Just Now!
X