News Flash

राज्यांना देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरर्सचं ऑडिट करा; पंतप्रधानांकडून आदेश

व्हेंटिलेटरर्सबाबत अनेक राज्यांतून तक्रारी

देशातील करोनाचं संकट पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उच्चस्तरीय बैठक बोलवली होती. या बैठकीत करोना स्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच देशातील लसीकरणाबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मंत्रालयातील मंत्री आणि अधिकारी यांचा सहभाग होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्राकडून राज्यांना देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरबाबतचे प्रश्न गंभीरतेने घेतले आहेत. याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करत ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.

काही राज्यांमध्ये व्हेंटिलेटरचा उपयोग केला जात नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरचं ऑडिट करण्याचे आदेश त्यांनी दिले. गरज पडल्यास आरोग्य कर्मचाऱ्यांना व्हेंटिलेटर वापरण्याचं प्रशिक्षण दिलं पाहीजे असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

लस घेतली किंवा नाही, पण त्रिसूत्रीचे पालन महत्वाचे; केंद्राच्या वैज्ञानिक सल्लागारांचे मत

गेल्या काही दिवसात अनेक राज्यातून पीएम केअर्स फंडातून देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये व्हेंटिलेटरबाबत तक्रारी आल्या आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही याबाबतची तक्रार पत्राद्वारे केंद्र सरकारला केली होती.

MP:भाजपा खासदाराने घरी करोना लस घेतल्याने संताप; विरोधकांकडून टीकेचा भडिमार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत करोना चाचण्या वाढवण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. या व्यतिरिक्त रुग्णांची संख्या आणि करोनावर मात करण्याऱ्या रुग्णांची माहितीही देण्यात आली. ग्रामीण भागात ऑक्सिजन पुरवण्याची योजना आखण्यास पंतप्रधान मोदी यांनी सूचना दिल्या आहेत. तसेच अधिकाऱ्यांना लसीकरण वेगाने करण्यासह राज्यांसोबत एकत्र काम करण्याचे आदेश दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2021 5:00 pm

Web Title: pm modi call audit of ventilators provided to states in review meeting rmt 84
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 लस घेतली किंवा नाही, पण त्रिसूत्रीचे पालन महत्वाचे; केंद्राच्या वैज्ञानिक सल्लागारांचे मत
2 MP:भाजपा खासदाराने घरी करोना लस घेतल्याने संताप; विरोधकांकडून टीकेचा भडिमार
3 तौते चक्रीवादळाचा रौद्रवतार! घरं जमीनदोस्त, वादळी पावसाने झाडं उन्मळून पडली
Just Now!
X