पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या दोन दिवसीय दौऱ्यानिमित्त सिंगापूरमध्ये पोहोचले आहेत. येथं ते आसियान समिटमध्ये सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर क्षेत्रीय व्यापक आर्थिक सहकार्य या संघटनेच्या नेत्यांच्या बैठकीतही पंतप्रधान सहभागी होणार आहेत.


दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे उपराष्ट्रपती माइक पेंस यांची बुधवारी येथे भेट होणार आहे. यावेळी दोघांमध्ये महत्वपूर्ण विषयावर चर्चा होण्याची शकता आहे. त्याचबरोबर भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये दिवपक्षीय सुरक्षा सहकार्य आणि स्वतंत्र व खुल्या हिंदी महासागरात प्रवेशाबाबत धोरणे आखण्यावर चर्चा होऊ शकते.

व्हाईट हाऊसकडून मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या माहिनुसार, दोन्ही नेत्यांमध्ये स्थानिक प्रमाणवेळेनुसर दुपारी साडेबारा वाजता भेट होईल. पेंस या दौऱ्यावर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावतीने हजर राहणार आहेत. या समिटमध्ये मोदी आपल्या अॅक्ट इस्ट पॉलिसीवरही चर्चा करणार असल्याचे सुत्रांकडून कळते.

दरम्यान, पहाटे सिंगापूरमध्ये दाखल झाल्यानंतर ते थांबलेल्या फुलट्रॉन हॉटेलमध्ये भारतीय वंशाच्या चाहत्यांनी मोदींची झलक पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी अनेकांनी त्यांच्यासोबत फोटोही काढून घेतले.