25 October 2020

News Flash

भारतीयांच्या सेवा-शक्तीमुळं कोरोनाला रोखण्यात यश : पंतप्रधान

मोदींची लॉकडाउनमधील तिसरी मन की बात

काही दिवसांपूर्वी एका राष्ट्राच्या नेत्याला मास्क न घातल्यामुळे दंड ठोठावण्यात आला. भारतातही आपल्याला अशीच परिस्थिती तयार करायची आहे.

इतर देशांच्या तुलनेत आपली लोकसंख्या अधिक आहे. तरीही संसर्ग आटोक्यात, मृत्यूदरही कमी, जे नुकसान झालं त्याचं दु:ख आहेच, मात्र जे वाचवू शकलो, त्याबद्दल जनतेचे आभार, कारण हा लढा जननेतृत्वात सुरु आहे. हा लढा प्रदीर्घ काळ चालणारा आहे. भारतीयांच्या सेवा-शक्तीमुळं कोरोनाला रोखण्यात यश आलं आहे. देशवासीयांची सेवाशक्ती ही आपली खरी ताकद असल्याचे ‘मन की बात’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

करोनाच्या लसीवर देशात जे काम सुरु आहे, त्याकडे जगाच्या नजरा आणि आपल्या आशा, या संकटाचा अनुभवही नाही आणि इलाजही, त्यामुळे हा लढा दीर्घकालीन असेल, प्रत्येक वर्गाला कोरोनाचा फटका बसला, मात्र गरीब सर्वाधिक पिचले गेले. श्रमिक आणि इतर ट्रेन सुरु, सावधानता बाळगून हवाई सेवा सुरु, उद्योगही सुरु, म्हणजेच अर्थव्यवस्थेचा मोठा भाग खुला झाला, अशात आपल्याला अधिक काळजी घ्यायला हवी, असे मोदी म्हणाले.

करोनापासून बचावासाठी विविध प्रकारे सावधानता बाळगत आपण आता विमान वाहतूक सुरु केली आहे. हळूहळू उद्योग व्यवसाय देखील सुरु झाले आहेत. म्हणजेच अर्थव्यवस्थेचा एक मोठा भाग आता सुरु झाला आहे. त्यामुळे आता आपल्याला अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमातून रविवारी त्यांनी देशवासियांशी संवाद साधला.

पंतप्रधान म्हणाले, “देशात सर्व नागरिकांच्या सामुहिक प्रयत्नांतून कोरनाविरोधातील लढाई अधिक मजबुतीने लढली जात आहे. आपली लोकसंख्या ही इतर देशांच्या तुलनेत कितीतरी पट अधिक आहे. तरी देखील करोनाचा आपल्या देशात इतर देशांच्या तुलनेत वेगानं फैलाव हाऊ शकला नाही. करोनामुळं होणारा मृत्यू दर देखील आपल्या देशात खूपच कमी आहे. मात्र, आपलं जे नुकसान झालं आहे त्याचं आपल्या सर्वांनाच दुःख आहे. मात्र, जे काही आपण वाचवू शकलो. ते निश्चितपणे देशाच्या सामुहिक संकल्पशक्तीचाच परिणाम आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2020 11:44 am

Web Title: pm modi man ki baat nck 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 Mann Ki Baat : आपल्याला आता अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता – पंतप्रधान
2 मरकजचा कार्यक्रम वेळीच रोखला असता, तर ही वेळ आली नसती; अमित शाहांची कबुली
3 आतापर्यंतची देशातील सर्वात मोठी वाढ, २४ तासांत आढळले ८ हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित
Just Now!
X