पुढच्या पाच वर्षात अर्थव्यवस्थेचा आकार दुप्पट करायचे भारताने ठरवले आहे. भारताला पाच लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे आमचे लक्ष्य आहे. भारतामध्ये ती क्षमता सुद्धा आहे आणि आमच्याकडे प्लानही आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी बहरीनमध्ये भारतीय समुदायाला संबोधित करताना म्हणाले. अर्थव्यवस्थेचा आकार दुप्पट झाला तर प्रत्येक भारतीयाचे उत्पन्न वाढेल. खरेदी करण्याची क्षमता वाढेल असे मोदींनी सांगितले.

मोदींच्या भाषणातील मुद्दे

– जगासमोर भारताने आपले सामर्थ्य दाखवले आहे.
– भारत आज जगासाठी चमत्कार करत आहे. त्यामुळे अनेकजण आश्चर्यचकीत आहेत.
– भारताची प्रतिभा ही जागतिक ओळख आहे.

– इन्फ्रास्टकचरचे जाळे उभारण्याचे भारतामध्ये मोठे काम सुरु आहे.
– लवकरच बहरीनमध्ये रुपे कार्ड सुरु होईल. त्यासंदर्भात आम्ही एक करार केला आहे.

– पुढच्या पाच वर्षात भारताला पाच ट्रिलियर डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य आहे.
– सामान्य भारतीयाला सशक्त करण्याचे माध्यम आहे.
– अर्थव्यवस्थेचा आकार दुप्पट झाला तर प्रत्येक भारतीयाचे उत्पन्न वाढेल. खरेदी करण्याची क्षमता वाढेल.
– पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचण्याची भारतामध्ये क्षमता आहे आणि प्लानही आहे.

– भारतात सर्वात स्वस्त इंटरनेट आहे.
– ५० कोटी भारतीयांना मोफत उपचार मिळतात.
– भारतातील बहुतांश कुटुंब बँकिंग सेवेशी जोडलेली आहेत.

– भारतीयांचा आत्मविश्वास उंचावला आहे. आता ते डोळयाला डोळा भिडवून बोलतात.

– बहरीनमध्ये भारतीयांनी त्यांच्या मेहनतीने स्वत:ची जागा बनवली आहे.

– बहरीनचे सत्ताधारी तुमचे कौतुक करत असताना अभिमानाने माझा ऊर भरुन येत होता.

– भारताच्या पंतप्रधानांना बहरीनला येण्यासाठी भरपूर वेळ लागला.
– बहरीनला येणारा मी पहिला पंतप्रधान ठरलो हे माझे भाग्य आहे.
– मला भारतात असल्यासारखे वाटत आहे.


– बहरीन बरोबर व्यापार, व्यवसायिक संबंध होतेच पण मानवता, संस्कृती, मुल्याचेही संबंध आहेत.
– अनेकतेमध्ये एकता ही भारताची शक्ती आहे.
– बहरीनचे न्यू इंडियामध्ये स्वागत आहे.
– दोन्ही देशांना परस्पराकडून भरपूर काही मिळाले आहे.