News Flash

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काकू नर्मदाबेन यांचं करोनाने निधन

अहमदाबादच्या रुग्णालयात घेत होत्या उपचार

(संग्रहित छायाचित्र)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काकू नर्मदाबेन मोदी यांचं करोनामुळे निधन झालं आहे. त्या अहमदाबादच्या एका रुग्णालयात उपचार घेत होत्या.  त्या ८० वर्षांच्या होत्या. त्या न्यू रानिप या भागात आपल्या परिवारासोबत राहत होत्या.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, नरेंद्र मोदी यांचे लहान भाऊ प्रल्हाद मोदी यांनी याविषयी माहिती दिली आहे. ते म्हणतात की, नर्मदाबेन या दहा दिवसांपासून करोनाने आजारी होत्या आणि रुग्णालयात उपचार घेत होत्या. नरेंद्र मोदी यांचे काका आणि नर्मदाबेन यांचे पती जगजीवनदास यांचं पूर्वीच निधन झालं आहे. नर्मदाबेन या त्यांच्या मुलांसोबत राहत होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2021 7:42 pm

Web Title: pm narendra modi aunt died in ahmadabad due to corona vsk 98
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “परिस्थिती हाताळता येत नसेल तर सांगा, केंद्राकडे जबाबदारी सोपवू”- उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला सुनावलं!
2 रेल्वेकडून राज्यांसाठी ४ हजार कोविड केअर कोच निर्मिती
3 चुकीला माफी नाही… मास्क न घातल्याबद्दल थायलंडच्या पंतप्रधानांना १४ हजारांचा दंड
Just Now!
X