News Flash

मोदींची टि्वटरवर कमाल : दहा महिन्यांत वाढले १ कोटी फॉलोअर्स, पार केली ६ कोटी फॉलोअर्सची संख्या

२०१९ मध्ये मोदींचं ट्विट ठरलं होतं ‘गोल्डन ट्विट’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विटर प्रोफाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वटरवर झेप घेतली असून, केवळ दहा महिन्यांमध्ये त्यांच्या टि्वटर फॉलोअर्सच्या संख्येत १ कोटी लोकांची भर पडली आहे. आपल्या प्रत्येक निर्णयाची, विविध विषयांची माहिती सतत मोदी टि्वटद्वारे देत असतात. मोदी जेव्ही गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून म्हणजेच २००९ पासूनच त्यांचं टि्वटर हँडल चांगलंच अॅक्टिव्ह आहे. दिवसेदिवस फॉलोअर्सची संख्याही वाढत आहे. रविवारी फॉलोअर्सच्या संख्येनं नवा उचांक गाठला आहे.

जागतिक नेत्यांच्या यादीत मोदींनी टि्वटरवही चांगलेच स्थान मिळवलेलं आहे. सध्या मोदी जागतिक नेत्यांच्या टि्वटर फॉलोअर्सच्या संख्येनुसार तिसऱ्या स्थानावर आहेत. सध्या या यादीत बराक ओबामा पहिल्या स्थानावर आहेत. त्यांच्या फॉलोअर्सची संख्या मोदींपेक्षाही दुप्पट आहे. सध्या १२ कोटी लोक बराक ओबामा यांना टि्वटरवर फॉलो करतात. मोदी यांना ६ कोटी लोक टि्वटरवर फॉलो करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्या स्थानावर असून त्यांच्या फॉलोअर्सची संख्या ८.३ कोटी आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे टि्वटर फॉलोअर्स ५ कोटी होते. गेल्या दहा महिन्यांच्या काळात त्यात १ कोटी फॉलोअर्सची भर पडली आहे. एकूण जगातील टॉप टि्वटर फॉलोअर्स असलेल्या लोकांच्या यादीतही मोदी यांचे स्थान १५ वे आहे.

२०१९ मध्ये मोदींचं ट्विट ठरलं होतं ‘गोल्डन ट्विट’

२०१९ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी एक ट्विट केलं होतं. जे वर्षातील गोल्डन ट्विट ठरलं आहे. ट्विटरकडून यांची घोषणा करण्यात आली होती. २०१९मध्ये लोकसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले. निकाल आल्यानंतर मोदी यांनी एक ट्विट केलं होतं. तेच ट्विट गोल्डन ट्विट ठरलं आहे.

सबका साथ + सबका विकास + सबका विश्वास = विजयी भारत
Together we grow.
together we prosper.
together we will build a strong and inclusive india.
india wins yet again! # vijayibharat
असं ट्विट नरेंद्र मोदी यांनी केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2020 4:35 pm

Web Title: pm narendra modi crosses 60mn followers on twitter bmh 90
Next Stories
1 ..तर दिल्लीवासियांनी ‘आप’ले ही आभार मानले असते ! गंभीरचा केजरीवालांना टोला
2 करोना विषाणूंशी लढण्याची काही लोकांमध्ये उपजत प्रतिकारशक्ती; अभ्यासातील निष्कर्ष
3 …हा भ्रम लवकरच तुटेल आणि देशाला याची जबर किंमत मोजावी लागेल; राहुल गांधींचा इशारा
Just Now!
X