२०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने सर्वसामान्य लोकांसाठी प्रधानमंत्री जन धन योजना आमंलात आणली होती. स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्टला या योजनेला चार वर्षं पूर्ण होणार आहेत. याचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून जन धन खातेधरकांना मोठं गिफ्ट देणार असल्याचे वृत्त आहे. गेल्या चार वर्षांत 32 कोटी 25 लाख जन-धन खाती उघडण्यात आली असून त्यात 80 हजार 674 कोटी रुपये जमा आहेत.

सहा महिने जन धन खाते वापरण्यात सातत्य राहिल्यास बँकेकडून खातेदारांना मिळणारे कर्जाची मर्यादा मोदी सरकार वाढवणार आहे. सध्या ५ हजार रूपये मिळणारे कर्ज दुप्पट होणार आहे. त्यामुळे सहा जन धन खाते वापरल्यास खातेदारांना १० हजार रूपयांचे कर्ज मिळू शकते. याशिवाय अटल पेन्शन योजनेअंतर्गत निवृत्तीवेतनाची मर्यादाही दुपट्ट होणार आहे. ही मर्यादा 5 हजार रुपयांवरून दहा हजार रुपये होऊ शकते.

याशिवाय या वर्षीच्या भाषणामध्ये पंतप्रधान मायक्रो इन्शूरन्स स्कीमची घोषणा करण्याची शक्यता आहे. रुपे कार्डधारकांना मिळणाऱ्या मोफत दुर्घटना विम्याची रक्कम 1 लाख रुपयांनी वाढवण्याचा विचारही सरकार करत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.