X
X

VIDEO: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पायऱ्यांवर अचानक तोल गेला आणि….

READ IN APP

सुरक्षा रक्षकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सावरलं, त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कानपूर दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी गंगा घाटाला भेट दिली. यावेळी पायऱ्या चढत असताना त्यांचा तोल गेला आणि ते अडखळून पडले. त्याचवेळी सुरक्षा रक्षकांनी त्यांना सावरलं. त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील नमामी गंगा प्रकल्पाची पाहणी केली. त्यांच्यासोबत योगी आदित्यनाथ यांच्यासह उत्तर प्रदेश मंत्रिमंडळातील अनेक मंत्रीही उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी गंगेच्या किनाऱ्यावर अटल घाट या ठिकाणी पायऱ्यांवरुन जात होते. त्याचवेळी त्यांचा तोल गेला आणि अडखळून पडले. मात्र त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना सावरलं. त्यामुळे त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

20
X