आयसिसशी एकनिष्ठता सांगणाऱ्या एका व्यक्तीने फ्रेंच पोलिस व त्याच्या पत्नीस ठार केले, असे चौकशीकर्त्यांनी सांगितले. हा दहशतवादी हल्ला होता यात शंका नाही, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्सवा ओलाँद यांनी रात्रीच्या या हल्ल्यातील उच्चस्तरीय सुरक्षा बैठक बोलावली असून युरो २०१६ स्पर्धाच्या पाश्र्वभूमीवर फ्रान्समध्ये अतिदक्षतेचा इशारा दिलेला असताना हा हल्ला झाला आहे. सूत्रांनी सांगितले, की चौकशीकर्त्यांना संबंधित पोलिसास ठार मारणाऱ्याचे नाव कळले असून ते लारोसी अबाला (वय २५) असे आहे. त्यांनी एएफ पीला सांगितले, की त्याला यापूर्वी पाकिस्तानातील जिहादींशी असलेल्या संबंधात शिक्षा झाली होती. त्याने पोलिसास त्याच्या मॅगननव्हिले या पॅरिसच्या वायव्येकडील उपनगरात भोसकले होते. या हल्ल्याच्या वेळी मोठे स्फोटाचे आवाज आले व हल्लखोराशी ‘रेड’ पोलिसांनी वाटाघाटीचे प्रयत्न केले पण ते फसले. अधिकाऱ्यांना पोलिसाच्या पत्नीचाही मृतदेह ते घरात शिरले असता सापडला. हल्लेखोर झटापटीत मारला गेला, असे अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाचे प्रवक्ते पीअर हेन्री बँडेट यांनी सांगितले. या जोडप्याच्या मुलास धक्का बसला असून त्याला इजा झालेली नाही पण त्याच्यावर वैद्यकीय लक्ष पुरवले जात आहे. मरण पावलेला पोलिस लेस म्युरेक्स येथे काम करीत होता व त्याची पत्नी स्थानिक पोलिस अधिकारी होती. त्यांची ओळख जाहीर केलेली नाही. चौकशी संबंधित सूत्रांनी सांगितले, की हल्लेखोराने अधिकाऱ्यांबरोबर बोलताना तो आयसिसशी संबंधित असल्याचे म्हटले होते. ‘साइट’ या गुप्तचर गटाने सांगितले, की आयसिसशी संबंधित ‘अमाक’ वृत्तसंस्थेनुसार आयसिसच्या या सैनिकाने लेस म्युरॉक्स येथे पोलिस स्टेशनचा प्रमुख व त्याच्या पत्नीस ठार केले आहे. हल्लेखोर अबाला याला २०१३ मध्ये तीन वर्षे सहा महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती पण ती निलंबित ठेवण्यात आली. आँलाँद यांनी अध्यक्षीय प्रासादात पंतप्रधान मॅन्युएल व्हॉल्स व अंतर्गत सुरक्षामंत्री कॅझेनवे व न्यायमंत्री जीन जॅकस उरव्होस यांची भेट घेतली.