05 March 2021

News Flash

Prakash Ambedkar :मराठा मोच्र्याविरोधात प्रतिमोर्चे काढू नका

हा मुद्दा सर्वात प्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी छेडला होता.

भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकरांचे दलित समाजाला आवाहन

आपल्या मागण्यांसाठी शांततामय मार्गाने मोर्चे काढण्याचा हक्क राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच सर्वाना दिला आहे. त्यामुळे मराठा समाजाचा हक्क असलेल्या मोच्र्याना विरोध म्हणून प्रतिमोर्चे काढू नका, असे आवाहन भारिप-बहुजन महासंघाचे प्रमुख, माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी दलित समाजाला केले आहे.

कोपर्डी बलात्कार प्रकरणाचा निषेध करण्यासाठी प्रत्येक जिल्हय़ात सुरू झालेल्या मराठा समाजाच्या मोच्र्यामधून आता दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा (अ‍ॅट्रॉसिटीज् अ‍ॅक्ट) रद्द करण्याची मागणी जोरात पुढे येऊ  लागली आहे. हा मुद्दा सर्वात प्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी छेडला होता.

आगीत तेल ओतण्यास दलित नेत्यांचा नकार

मराठा समाजामधून कायदा रद्द करण्याची मागणी येऊ  लागल्यानंतर दलित समाजामध्ये अस्वस्थता वाढली आहे. तरीदेखील जातीय संवेदनशीलता लक्षात घेऊन दलित नेत्यांनी मराठा समाजाच्या मागणीला आक्रमक प्रत्युत्तर देण्याचेो टाळल्याचे दिसते आहे. वातावरण तापलेले असताना दुर्लक्ष करण्यात अधिक शहाणपणा असल्याचे मत एका दलित नेत्याने व्यक्त केले. दुसरीकडे मराठा व दलित यांच्यामधील तणाव दूर करण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिर्डीमध्ये मराठा-दलित ऐक्य परिषद आयोजित केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2016 2:05 am

Web Title: prakash ambedkar comment on maratha morcha
टॅग : Prakash Ambedkar
Next Stories
1 बिहारमधील सत्तारूढ महाआघाडीत तणाव?
2 भाताच्या नव्या प्रजातीसाठी भारत-ऑस्ट्रेलिया सहकार्य
3 डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना न्यूमोनिया
Just Now!
X