News Flash

छातीत दुखत असल्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद रूग्णालयात दाखल

दिल्लीतील आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

संग्रहित

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना अस्वस्थ वाटू लागल्याने व प्रकृती खालवल्याने त्यांना आज(शुक्रवार) सकाळी दिल्लीमधील आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या ठिकाणी त्यांची तपासणी सुरू आहे.

छातीत दुखत असल्याने, नियमीत तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रपती दोन दिवसांच्या हरिद्वार दौऱ्यावर जाणार होते, पतंजली योगपीठाचा जो पदवीदान समारंभ आहे, यामध्ये राष्ट्रपती सहभागी होणार होते. मात्र मध्येच त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांचा हा दौरा रद्द करावा लागलेला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2021 1:37 pm

Web Title: president ram nath kovind visited army hospital following chest discomfort this morning msr 87
Next Stories
1 दिलासादायक बातमी… १२ वर्षांखालील मुलांवर करोना लसीची चाचणी सुरु
2 भारतात तब्बल ५९ हजार ११८ नव्या रुग्णांची नोंद; ऑक्टोबरनंतरची सर्वाधिक रुग्णवाढ
3 शेतकऱ्यांकडून आज भारत बंदची हाक; रस्ते आणि रेल्वे वाहतूक रोखण्याचा इशारा
Just Now!
X