पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे मंगळवारी अंत्यदर्शन घेतले. दिल्लीतील १० राजाजी मार्ग येथील घरी प्रणव मुखर्जींचे पार्थिव अत्यंदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.  इतर नेत्यांनीही मुखर्जींच्या अत्यंदर्शनासाठी हजेरी लावली.

दरम्यान, उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडू यांनी प्रणव मुखर्जी यांचे अंत्यदर्शन घेतले.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी प्रणव मुखर्जींना वाहिली श्रद्धांजली

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधिर रंजन चौधरी आणि सीपीआयचे नेते डी. राजा यांनी प्रणव मुखर्जींचे घेतले अंत्यदर्शन

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी प्रणव मुखर्जींना केलं अभिवादन

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रणव मुखर्जींचे घेतले अंत्यदर्शन

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे घेतले अत्यंदर्शन

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी प्रणव मुखर्जी यांना केलं अभिवादन

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे अंत्यदर्शन घेतले.

भाजपा नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहिली.

माजी राष्ट्रपती, मुरब्बी राजकारणी, काँग्रेसचे संकटमोचक नेते, भारतरत्न प्रणब मुखर्जी यांचे सोमवारी लष्कराच्या रुग्णालयात निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या निधनानिमित्त सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.