News Flash

५० हजार मेट्रिक टन ऑक्सिजनच्या आयातीचा प्रस्ताव

अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निर्णय

संग्रहीत छायाचित्र

देशात सध्या करोनाची दुसरी लाट सुरू आहे. दररोज मोठ्यासंख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही वाढ सुरूच आहे. दरम्या, अनेक ठिकाणी रूग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता करोनाबाधितांवर उपाचारासाठी अत्यावश्यक असणाऱ्या मेडिकल ऑक्सिजनची आयात केली जाणार आहे. केंद्र सरकारने ५० हजार मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजन आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून ज्या राज्यांमध्ये या ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा आहे, तिथे पुरवठा करता येईल व ऑक्सिजनचा तुटवडा नष्ट करता येईल.

केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे की, करोनाबाधितांची दिवसेंदिवस वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीर ५० हजार मेट्रिक टन ऑक्सिजनसाठी प्रस्ताव मागवले जातील. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तसेच परराष्ट्र मंत्रालयाला आयातीसाठी संभाव्य संसाधनं शोधण्याचे देखील निर्देश दिले गेले आहेत.

ऑक्सिजनचा पुरवठा जेमतेम; रेमडेसिविरचाही तुटवडा

लवकरच होणार अधिसूचना प्रसिद्ध –
आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे की, या संबंधी ते आदेश काढू शकतात आणि यास गृह मंत्रालयाद्वारे अधिसूचित केले जाईल. आवश्यकता असणाऱ्या या १२ राज्यांमध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, उत्तरप्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानचा समावेश आहे.

दिल्लीत काल (गुरूवार) पार पडलेल्या Empowered Group-2 (EG2) च्या बैठकीत देशातील अनिवार्य मेडिकल साहित्य आणि ऑक्सिजनच्या उपलब्धतेबाबत चर्चा झाली. सध्या पीएम केअर्स फंड अंतर्गत देशातील १०० नव्या रूग्णालयांमध्ये त्यांचाय स्वतःचा ऑक्सिजन प्लॉन्ट आहे.

महाराष्ट्राच्या मदतीला धावले अंबानी! गुजरातच्या फॅक्टरीतून १०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा

महाराष्ट्रात करोनाची स्थिती हाताबाहेर जात असल्याने राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंधांची घोषणा केली आहे. करोना संसर्गाची साखळी तोडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासोबतच राज्य सरकारसमोर अनेक मोठी आव्हानं आहेत. राज्यात रेमडेसिवीरचा तसंच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्य सरकारने यासाठी केंद्राकडे मदतही मागितली आहे. दरम्यान राज्याच्या मदतीसाठी उद्योगपती मुकेश अंबानी यांनी पुढाकार घेतला आहे. जगातील सर्वात मोठी रिफायनिंग कॉम्प्लेक्स चालवणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेकडून महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठा केला जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2021 1:57 pm

Web Title: proposal to import 50000 metric tons of oxygen msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पाकिस्तानात सोशल मीडियावर तात्पुरती बंदी; हिंसाचार रोखण्यासाठी निर्णय
2 यंदा देशात समाधानकारक पाऊस होणार! सरासरीच्या ९८ टक्के पावसाचा हवामान विभागाचा अंदाज!
3 “अनुभवाच्या जोरावर करोना रोखणार”, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांना आत्मविश्वास
Just Now!
X