* १४२ आंदोलकांना अटक
जाट संप्रदायाच्या आरक्षण मुद्द्यावरुन जवळपास दीडशे आंदोलकांनी सुरक्षाव्यवस्थेला डावळत सरळ केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नवी दिल्लीतील क्रमांक २, कृष्णामेनन मार्ग येथील निवासस्थानी प्रवेश केला. तसेच त्यांच्या निवासस्थानी तोडफोज केली असल्याचे पोलिसांनी दिलेल्या माहितीतून समजते. त्यामुळे देशाच्या केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत झालेल्या निष्काळजीपणामुळे १३ पोलिस अधिका-यांचे निलंबन करण्यात आले. तसेच १४२ आंदोलकांना नवी दिल्ली पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर अनधिकृतपणे घरात प्रवेश करणे आणि वाहतूक विस्कळीत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेदरम्यान सुशिलकुमार शिंदे निवासस्थानी उपस्थित नसल्याचे सुत्रांनी दिलेल्या माहितीतून समजते आहे. ते रुसच्या अधिकृत दौ-यावर आहेत
संग्रहित लेख, दिनांक 11th Apr 2013 रोजी प्रकाशित
सुशीलकुमार शिंदेंच्या निवासस्थानी सुरक्षेत निष्काळजीपणा, १३ पोलिस कर्मचाऱयांचे निलंबन
जाट संप्रदायाच्या आरक्षण मुद्द्यावरुन जवळपास दीडशे आंदोलकांनी सुरक्षाव्यवस्थेला डावळत सरळ केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नवी दिल्लीतील क्रमांक २, कृष्णामेनन मार्ग येथील निवासस्थानी प्रवेश केला.

First published on: 11-04-2013 at 12:04 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protesters enter shinde house 13 cops suspended