करोना महामारीला आटोक्यात आणण्यासाठी भारत सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. लवकरच देशात प्रत्यक्ष लसीकरणास देखील सुरूवात होणार आहे. मात्र त्या अगोदर उद्या(८ जानेवारी) देशभरातील ३३ राज्ये व केंद्रशासीत प्रदेशामध्ये दुसरा ड्राय रन घेतला जाणार आहे. तर, देशभरात लस वितरणासाठी पुणे हे मध्यवर्ती केंद्र असणार आहे.

करोना लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये उद्या दुसरा ड्राय पार पडणार आहे. यासाठी आज किंवा उद्या लस पोहचवण्याचे काम केले जाणार आहे. सरकारकडून प्रवासी विमानांना लसींची वाहतूक करण्यास परवानगी दिली गेली आहे. तर, देशभरात लस वितरणासाठी पुणे हे मध्यवर्ती केंद्र असणार आहे. पुण्यातून संपूर्ण देशभरात लसींचा पुरवठा केला जाणार आहे.

Coronavirus : देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये ८ जानेवारीला दुसरा ‘ड्राय रन’

उत्तर भारतासाठी दिल्ली व करनाल मिनी हब बनवण्यात आले आहेत. तर पूर्व भारतासाठी कोलकाता हे केंद्र असणार आहे. ईशान्य भारतातही कोलकातामधूनच लसींचा पुरवठा होणार आहे. याशिवाय, दक्षिण भारतासाठी चेन्नई व हैदराबाद प्रमुख केंद्र असणार असल्याची देखील माहिती सरकारी सुत्रांकडून समोर आली आहे.

दरम्यान, आज केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दुसऱ्या ड्राय रनच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरंन्सिगद्वारे सर्व राज्यांमधील आरोग्यमंत्र्यांबरोबर चर्चा देखील केली.

कोविड योद्ध्यांना लसीकरणासाठी नोंदणीची गरज नाही – आरोग्य मंत्रालय

भारतात सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे. डीसीजीआयने ३ जानेवारी रोजी या लसींना मंजुरी दिली होती, त्यामुळे आता १३ ते १४ जानेवारीपर्यंत प्रत्यक्ष लसीकरणास देशात सुरूवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशभरात एकूण ४१ ठिकाणं अंतिम करण्यात आलेली असून, तिथे लस पोहचवण्याचे काम निर्धारित करण्यात आलं आहे. अशी माहिती सरकारी सूत्रांकडून मिळालेली आहे.