01 March 2021

News Flash

रेल्वे अर्थसंकल्प २०१३: प्रवाशांसाठी कोणत्या सुविधा?

रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी मंगळवारी लोकसभेत सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पातून सामान्य प्रवाशांसाठी उपयुक्त ठरू शकणाऱया पुढील सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

| February 26, 2013 04:16 am

रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी मंगळवारी लोकसभेत सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पातून सामान्य प्रवाशांसाठी उपयुक्त ठरू शकणाऱया पुढील सुविधा पुरविण्यात येणार आहेत.
– देशातील महत्त्वाच्या १०४ रेल्वेस्थानकांवरील साफसफाई उच्च दर्जाची कशी राहील, याकडे लक्ष देणे.

– रेल्वेगाड्यांमधील जैविक शौचालयांची संख्या उत्तरोत्तर वाढविणे

– ऑन बोर्ड हाऊसकिपिंग स्कीम आणि क्लिन ट्रेन स्टेशन स्कीमचा अधिकाधिक रेल्वेस्थानकांवर विस्तार करणे

– अनारक्षित तिकीट प्रणाली, ऑटोमॅटिक तिकीट वेंडिग मशीन, कॉइन ऑपरेडेट तिकिट वेंडिग मशिनचा विस्तार करणे

– विजयवाडा, नागपूर, ललितपूर, विलासपूर, जयपूर आणि अहमदाबाद येथे रेल्वे शुद्ध पाणी बॉटलिंग करण्याचा प्रकल्प करणे

– गाडीमध्ये घोषणा आणि इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले यंत्रणा बसविणे

– काही गाड्यांमध्य निशुल्क वाय-फाय यंत्रणा उपलब्ध करून देणे

– उत्कृष्ट अंतर्गत रचना आणि अत्याधुनिक सुविधा असलेला अनुभूती नावाचा एक डबा निवडक गाड्यांना जोडणे

– ज्येष्ठ व्यक्तींसाठी आणि अपंगांसाठी महत्त्वाच्या स्थानकांवर ४०० लिफ्ट आणि १७९ स्वयंचलित सरकते जिने बसवणे.

– तात्काळ आणि अन्य आरक्षित तिकिटांमधील भ्रष्टाचार रोखणे

– रेल्वेगाड्यांमधील खाण्यापिण्याच्या सोयींबद्दल माहिती आणि तक्रार नोंदविण्यासाठी १८०० १११ ३२१ हा टोल फ्री नंबर सुरू करणार.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2013 4:16 am

Web Title: railway budget 2013 facilities provided for passengers
टॅग : Railway Budget
Next Stories
1 विश्व नष्ट होणार की वाचणार, हे हिग्ज बोसॉनच्या वस्तुमानावर अवलंबून
2 ‘सहारा’च्या वेळकाढूपणाला सर्वोच्च न्यायालयाचा लगाम
3 पंतप्रधानपदासाठी पक्षाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्षांनाच पसंती- थरूर
Just Now!
X