मध्य प्रदेशातील सत्ता गेल्यानंतर राजस्थानमधील काँग्रेसच्या सरकारवर अस्थिरतेचे ढग घोंगावू लागले आहे. घोडेबाजाराच्या प्रकरणात नोटीस आल्यानंतर नाराज झालेले काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे दिल्लीत असून, काँग्रेसकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे राजस्थानमधील काँग्रेस नेत्यांच्या कार्यालये व निवासस्थानावर आयकर विभागानी धाडी टाकल्या आहेत. त्यामुळे राजस्थानात काय होणार याकडे दिल्लीतील राजकीय वर्तुळासह सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
इतिहास त्यांना कधीही माफ करणार नाही; आमदारांच्या बैठकीत गेहलोत यांचे उद्गार
राजस्थान मध्य प्रदेशच्या वाटेवर; संपूर्ण घडामोडी, ब्रेकिंग एका क्लिकवर
लोकसत्ता ऑनलाइन | Jul 13, 2020 09:21 pm

राजस्थानमधील राजकीय गुंता सोडवण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी व प्रियंका गांधींनीही पुढाकार घेतल्याचं वृत्त समोर आलं होतं. राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी सचिन पायलट यांच्यासोबत चर्चा केल्याचं म्हटलं जात असतानाच सचिन पायलट यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. राहुल गांधी यांच्याशी कोणतीही चर्चा केली नसल्याचं सचिन पायलट यांनी म्हटलं आहे, असं वृत्त एनडीटीव्ही इंडियानं दिलं आहे.
राजस्थान सध्या देशातील राजकीय घडामोडींचं केंद्र बनलं आहे. सरकारसमोरील अस्थिरतेचं संकट टाळण्यासाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेस ताकदीनं प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. या राजकीय नाट्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उटमत असून, रितेश देशमुखांनीही यावर दोन शब्दात भाष्य केलं आहे. 'शेवटचा उपाय' असं म्हणत रितेश देशमुखांनी या नाट्याचं वर्णन केलं आहे.
राजस्थानमधील काँग्रेस सरकार राजकीय संकटातून जात असून, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी काँग्रेस आमदारांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत गेहलोत यांच्या पाठिंब्याचा ठराव संमत करण्यात आला. यावेळी बोलताना अशोक गेहलोत म्हणाले,"जेव्हा ते (भाजपा) लोकशाही पद्धतीनं निवडणुका जिंकू शकत नाही. तेव्हा ते ईडी, सीबीआय आणि इतर यंत्रणा घेऊन येतात. यासाठी इतिहास त्यांना कधीही माफ करणार नाही," अशी टीका गेहलोत यांनी भाजपावर केली.
काँग्रेस सरकारसमोर अस्थिरतेचं संकट उभं राहण्याची चिन्ह असताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी व्हिप जारी करत काँग्रेस आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला शंभरहून अधिक आमदार उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर आमदार बसने बाहेर पडले. त्यावेळी त्यांनी ऑल इज वेल अशी प्रतिक्रिया दिली.
राजस्थानातील राजकीय घडामोडींवरून वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात असताना, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडून सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सचिन पायलट यांनी बंडखोरी केल्यानंतर अशोक गेहलोत यांनी समर्थक आमदारांची घरी जुळवाजुळव सुरू केली असून, आमदारांचं शक्तीप्रदर्शन सुरू आहे.
राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी पक्षाच्या २५ आमदारांचा त्यांना पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी जयपूरला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. वाचा सविस्तर बातमी
राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी पक्षाच्या २५ आमदारांचा त्यांना पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी जयपूरला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. वाचा सविस्तर बातमी
उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या नाराजीमुळे राजस्थानमधील काँग्रेस सरकार अस्थिरतेच्या लाटेवर हेलकावे खाताना दिसत आहे. सचिन पायलट यांची मनधरणी सुरू असताना काँग्रेसच्या जयपूर येथील प्रदेश कार्यालयातून पायलट यांचे पोस्टर हटवण्यात आले आहेत.
उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या नाराजीमुळे राजस्थानमधील काँग्रेस सरकार अस्थिरतेच्या लाटेवर हेलकावे खाताना दिसत आहे. सचिन पायलट यांची मनधरणी सुरू असताना काँग्रेसच्या जयपूर येथील प्रदेश कार्यालयातून पायलट यांचे पोस्टर हटवण्यात आले आहेत.
राजस्थानमध्ये राजकीय अस्थिरतेचे धक्के जाणवू लागले असून, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या घरी आमदारांना बोलावण्यात आलं आहे. या आमदारांचा फोटो समोर आला आहे. अशोक गेहलोत यांनी १०२ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा आधीच केला आहे.
राजस्थानमध्ये सुरू झालेल्या राजकीय नाट्यात आज नवं मिळण्याची शक्यता आहे. सचिन पायलट यांनी आपल्यासोबत १०२ आमदार असल्याचा दावा केला असला तरी सत्ताधारी काँग्रेसच्या बैठकीला केवळ १८ आमदार अनुपस्थित राहिल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे पायलट यांच्याकडे नेमके किती आमदार आहेत, याची चर्चा आता सुरू झाली आहे.
राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय कुरघोड्यांवरून भाजपाच्या नेत्या उमा भारती यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. "राजस्थानमध्ये जे काही घडत आहे आणि मध्य प्रदेशात जे काही घडलं, त्याला राहुल गांधी जबाबदार आहेत. ते तरुण नेतृत्त्वाला मोठं होऊ देत नाही. शिक्षित आणि क्षमता असलेले ज्योतिरादित्य शिंदे व सचिन पायलट यांच्यासारख्या नेत्यांना उच्च पद मिळाली, तर ते मागे पडतील, असं त्यांना वाटत," असा आरोप उमा भारती यांनी केला आहे.
राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय कुरघोड्यांवरून भाजपाच्या नेत्या उमा भारती यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. "राजस्थानमध्ये जे काही घडत आहे आणि मध्य प्रदेशात जे काही घडलं, त्याला राहुल गांधी जबाबदार आहेत. ते तरुण नेतृत्त्वाला मोठं होऊ देत नाही. शिक्षित आणि क्षमता असलेले ज्योतिरादित्य शिंदे व सचिन पायलट यांच्यासारख्या नेत्यांना उच्च पद मिळाली, तर ते मागे पडतील, असं त्यांना वाटत," असा आरोप उमा भारती यांनी केला आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी यांनी सरकार स्थिर असून, १०२ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. गेहलोत यांनी केलेला दावा चुकीचा असल्याचं सचिन पायलट यांनी म्हटलं आहे. २५ आमदार आपल्यासोबत असून, आपण पक्षाच्या बैठकीला जाणार नाही, असंही पायलट यांनी स्पष्ट केलं आहे.
पोलिसांच्या नोटीसीनंतर बंडाचा झेंडा हाती घेतलेले राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरु आहेत. सचिन पायलट यांच्यासाठी सर्व दरवाजे खुले असल्याचं काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. सोबतच भाजपाने कितीही षडयंत्र रचलं तरी राजस्थानमधील सरकार मजबूत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी रविवारी बंडाचा झेंडा हाती घेतला. रविवारी दिवसभर घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर काँग्रेसने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलेल्या दाव्याला पाठिंबा देण्यासाठी रात्री २.३० वाजता पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेसने आपल्याकडे १०९ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला.
गेल्या महिन्यात झालेल्या राज्यसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसचे मुख्य प्रतोद महेश जोशी यांनी, राज्यातील सत्ताधारी पक्षाचे आमदार फोडण्याचे डावपेच भाजप आखत असल्याची तक्रार पोलिसांत केली होती. त्याआधारे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपच्या फोडाफोडीच्या कथित कारस्थानाच्या चौकशीला गती दिली. त्यासंदर्भात गेहलोत यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन २५-३० कोटी देऊन काँग्रेसचे आमदार खरेदी करण्याचा आणि राजस्थानातील सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप पुन्हा केला.
राजस्थानातील काँग्रेसचे सरकार अस्थिर करण्याचा भाजप प्रयत्न करत असल्याच्या तक्रारीनंतर, पोलिसांनी सचिन पायलट यांना चौकशीसाठी नोटीस बजावल्याने त्यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्याविरोधात संताप व्यक्त करत रविवारी काही समर्थक आमदारांसह दिल्ली गाठली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे खंदे समर्थक आणि संघटनात्मक महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी गेहलोत आणि पायलट यांच्या विकोपाला गेलेल्या सत्तासंघर्षांचा अहवाल राहुल यांना दिला.