22 September 2020

News Flash

‘दाऊदबाबत संसदेत सोमवार किंवा मंगळवारी निवेदन’

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याबाबत येत्या सोमवार अथवा मंगळवारी आपण संसदेत निवेदन करणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले.

| May 10, 2015 03:20 am

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याबाबत येत्या सोमवार अथवा मंगळवारी आपण संसदेत निवेदन करणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले.
दाऊद इब्राहिम याचा ठावठिकाणा माहिती नाही, असे लेखी उत्तर केंद्रीय गृहराज्यमंत्री हरिभाई चौधरी यांनी लोकसभेत दिल्याने वाद निर्माण झाला आहे.
सरकारला दाऊद इब्राहिम याचा ठावठिकाणा माहिती नाही, तो माहिती झाल्यावर त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे चौधरी यांनी लेखी उत्तरात म्हटले होते. त्यानंतर वाद झाला होता. विरोधकांनी सरकारवर भूमिका बदलल्याची टीका केली होती. त्यामुळे सरकारची कोंडी झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2015 3:20 am

Web Title: rajnath singh will make statement in parliament on dawood
टॅग Dawood,Rajnath Singh
Next Stories
1 राजकारणापेक्षा एनडीएचा कारभार पाहा- नायडू
2 सामाजिक सुरक्षेच्या तीन योजना सुरू
3 हेलिकॉप्टर दुर्घटनेतील मृतदेह इस्लामाबादला आणले
Just Now!
X