News Flash

Republic Day 2020 : राजपथावर देशाची संस्कृती आणि सामर्थ्याचे दर्शन

भारताचा ७१वा प्रजासत्ताक दिन आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. राजधानी दिल्लीसह विविध राज्यांमध्ये यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

भारताचा ७१वा प्रजासत्ताक दिन आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. राजधानी दिल्लीसह विविध राज्यांमध्ये यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, राजपथावर देशाच्या सामर्थ्याचे आणि सांस्कृतीचे दर्शन घडवणारे विविध राज्यांचे चित्ररथ आणि भारतीय सैन्य दलांच्या जवानांनी आपले सामर्थ्य जगाला दाखवले. यंदा प्रमुख पाहुणे म्हणून ब्राझिलचे राष्ट्रपती जेर मेसिअस बोलसोनारो यांनी मुख्य सोहळ्याला हजेरी लावली होती.

 

Live Blog
Highlights
  • 10:25 (IST)

    राष्ट्रपतींच्या हस्ते राजपथावर ध्वजारोहण

    नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ७१व्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर ध्वजारोहण केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्रीमंडळातील विविध मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते. ब्राझीलचे पंतप्रधान हे यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. दरम्यान, राजपथावर पथसंचालनाला सुरुवात झाली आहे. 

  • 08:46 (IST)

    लडाख : आयटीबीपीच्या जवानांचे १७,००० फुटांवर ध्वजारोहण

    लडाख : इंडो-तिबेटिअन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) च्या जवानांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त १७,००० फुट उंचीवर ध्वजारोहण केले. सध्या या ठिकाणचे तापमान हे उणे २० डिग्री इतके आहे. अशा बिकट वातावरणातही त्यांच्यामध्ये प्रजासत्ताक दिनाचा उत्साहात जराही कमी झालेला दिसत नाही. 

12:01 (IST)26 Jan 2020
पथसंचलन सोहळा समाप्त; पंतप्रधानांकडून जनतेच्या शुभेच्छांचा स्विकार

राजपथावरील प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा समाप्त झाला असून यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे उपस्थित जनतेकडून शुभेच्छा स्विकारल्या.

11:43 (IST)26 Jan 2020
ब्राझिलचे राष्ट्रपती बोलसोनारो राष्ट्रपती भवनाकडे रवाना
11:38 (IST)26 Jan 2020
राजपथ : सुखोई ३० एमकेआय लढाऊ विमानांची प्रात्यक्षिकं

विंग कमांडर यथार्थ जोहरी आणि फ्लाईट लेफ्टनंट एस मिश्रा यांनी Su-30MKI या लढाऊ विमानांद्वारे केलेल्या हवाई कवायतींमुळे राजपथावर उपस्थित असलेल्यांना आचंबित केले.

भारतीय वायू दलाच्या पायलट्सने लढाऊ विमानांच्या मदतीने आकाशात त्रिशूल तयार करण्याची कमाल केला. ग्रुप कॅप्टन निशित ओहरी यांनी या पथकाचे नेतृत्व केले. त्यांच्यासोबत विंग कमांडर निलेश दिक्षित आणि विंग कमांडर करण डोगरा हेही या साहसी कवायतीमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी यासाठी Su-30 MKI या लढाऊ विमानांचा वापर केला.

11:36 (IST)26 Jan 2020
राजपथ : दोन महिला पोलिसांचे साहस

इन्स्पेक्टर सीमा नाग आणि हेड कॉन्स्टेबल मीना चौधरी यांनी आपल्या साहसाचे दर्शन राजपथावर घडवले. इन्स्पेक्टर सीमा यांनी मोटरसायकलवर उभे राहून सलामी दिली तर हेड कॉन्स्टेबल मीना चौधरी यांनी चालत्या मोटरसायकलवर उभे राहून दोन्ही हातांनी बंदूक चालवण्याची कवायत करून दाखवली. त्यांच्या या साहसाचे उपस्थितांनी चांगलेच कौतुक केले.

10:48 (IST)26 Jan 2020
यंदा ब्राझिलच्या राष्ट्रपतींना प्रमुख पाहुण्यांचा सन्मान
10:30 (IST)26 Jan 2020
जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांच्या हस्ते जम्मूत ध्वजारोहण
10:27 (IST)26 Jan 2020
राजपथावर परेडला सुरुवात
10:25 (IST)26 Jan 2020
राष्ट्रपतींच्या हस्ते राजपथावर ध्वजारोहण

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ७१व्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर ध्वजारोहण केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्रीमंडळातील विविध मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते. ब्राझीलचे पंतप्रधान हे यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. दरम्यान, राजपथावर पथसंचालनाला सुरुवात झाली आहे. 

09:45 (IST)26 Jan 2020
दिल्ली : पंतप्रधान राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इंडिया गेट परिसरातील राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे पोहोचले असून या ठिकाणी त्यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, लष्कर प्रमुख नरवणे, नौदल प्रमुख अॅडमिरल करमबिर सिंह, हवाई दल प्रमुख एअर मार्शल आर. के. एस. भदोरिया यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.

09:35 (IST)26 Jan 2020
दिल्ली : ७१व्या प्रजासत्ताकदिनाचे साक्षीदार होण्यासाठी राजपथावर झालेली गर्दी
09:34 (IST)26 Jan 2020
दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवासस्थानी केले ध्वजारोहण
09:33 (IST)26 Jan 2020
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
08:46 (IST)26 Jan 2020
लडाख : आयटीबीपीच्या जवानांचे १७,००० फुटांवर ध्वजारोहण

लडाख : इंडो-तिबेटिअन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) च्या जवानांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त १७,००० फुट उंचीवर ध्वजारोहण केले. सध्या या ठिकाणचे तापमान हे उणे २० डिग्री इतके आहे. अशा बिकट वातावरणातही त्यांच्यामध्ये प्रजासत्ताक दिनाचा उत्साहात जराही कमी झालेला दिसत नाही. 

08:40 (IST)26 Jan 2020
भुवनेश्वर : ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या हस्ते ध्वजारोहण
08:39 (IST)26 Jan 2020
मुंबई: मध्य रेल्वेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ध्वजारोहण
08:34 (IST)26 Jan 2020
नागपूर : रा. स्व. संघाच्या मुख्यालयात ध्वजारोहण

नागपूर : येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्य कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. दरम्यान, संघाचे सरचिटणीस भय्याजी जोशी यांच्या हस्ते राष्ट्रध्वाजाचे आरोहण करण्यात आले. यावेळी संघटनेचे अनेक पदाधिकारी आणि स्वयंसेवकांनी उपस्थिती लावली.

08:31 (IST)26 Jan 2020
चेन्नई : मरिना बीच येथे परेडचे आयोजन
08:30 (IST)26 Jan 2020
चेन्नई : राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते ध्वजारोहण
08:27 (IST)26 Jan 2020
नवी दिल्ली : शाहीन बाग येथे ध्वजारोहण
08:26 (IST)26 Jan 2020
मुंबई : आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी काढला तिरंगा मार्च
08:25 (IST)26 Jan 2020
उत्तराखंड : मंदिरात तिरंग्याच्या रुपात पुष्प अर्पण
08:22 (IST)26 Jan 2020
पंतप्रधानांच्या देशवासियांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
Next Stories
1 पद्म पुरस्कारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर..
2 संघर्ष करा, पण अहिंसक मार्गाने
3 जेटली, स्वराज, फर्नाडिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण