22 October 2020

News Flash

मुंबई पोलीस शांत का?; कलाविश्वातील घडामोडींवर रुपा गांगुली यांची आगपाखड

कलाविश्वातील ड्रग्ज प्रकरणावर रुपा गांगुली संतापल्या; म्हणाल्या...

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास सुरु असतानाच यात ड्रग्स कनेक्शन हा नवा मुद्दा समोर आला आहे. त्यामुळे सध्या कलाविश्वात एकच खळबळ माजली आहे. त्यातच भाजपा नेत्या रुपा गांगुली यांनी या प्रकरणी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. ‘बॉलिवूडने अनेकांना ड्रग्जच्या व्यसनाची सवय लावली आहे’, असं म्हणत रुपा गांगुली यांनी आगपाखड केल्याचं ‘एएनआय’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

“मुंबईतील फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेकांच्या हत्या होतात, काही जणांना व्यसनाची सवय लावली जाते. इतकंच कशाला येथे महिलांचा अपमानदेखील केला जातो. मात्र कोणी याविषयी काहीच बोलत नाही. मुंबई पोलीस शांतपणे हे सारं पाहत आहेत”, असं रुपा गांगुली म्हणाल्या.

आणखी वाचा- ड्रग्ज प्रकरण : तपासादरम्यान अभिनेत्री दीपिका पदुकोणचंही नाव आलं समोर

पुढे त्या म्हणतात, “अनुराग कश्यपवर पायल घोषने जे गैरवर्तनाचे आरोप केले त्याप्रकरणी इंडस्ट्री शांत कशी काय आहे? का बरं मुंबई पोलीस त्यांच्याविरोधात काहीच कारवाई करत नाही?”

आणखी वाचा- अभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा

दरम्यान, अभिनेत्री रुपा गांगुलीने चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर गैरवर्तणुकीचे आरोप केले आहेत. या प्रकारानंतर कलाविश्वात एकच चर्चा सुरु झाली आहे. यात अनेकांनी अनुराग कश्यपला पाठिंबा दिला आहे. तर काहींनी त्याच्यावर सडाडून टीका केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2020 2:24 pm

Web Title: rupa ganguly attacks bollywod says mumbai film industry kills people makes them drug addict ssj 93
Next Stories
1 इथेपण खोटेपणा, चिनी एअरफोर्सच्या व्हिडीओमध्ये हॉलिवूडच्या क्लिप्स
2 शी जिनपिंग यांच्यावर करोना परिस्थितीवरुन टीका करणाऱ्या बड्या उद्योजकाला १८ वर्षांचा तुरुंगवास
3 दिलासादायक… करोनाविरुद्धच्या लढाईला ‘रेकॉर्डब्रेक’ यश; २४ तासांमध्ये एक लाख रुग्ण झाले करोनामुक्त
Just Now!
X