12 August 2020

News Flash

… आणि खासदार सचिन तेंडुलकर राज्यसभेत अवतरले

राज्यसभेत यायला वेळ का नाही?

सचिन तेंडुलकरची अखेर राज्यसभेत हजेरी

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि खासदार सचिन तेंडुलकर गुरूवारी राज्यसभेत आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. दोन दिवसांपूर्वीच समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी सभागृहातील अनुपस्थितीच्या मुद्द्यावरून सचिन तेंडुलकर व अभिनेत्री रेखा यांच्यावर आगपाखड केली होती. त्यानंतर लगेचच सचिनने राज्यसभेच्या आजच्या कामकाजाला हजेरी लावल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले. यावेळी सचिन बराच काळ सभागृहातील चर्चा ऐकत बसला होता. नरेश अग्रवाल यांनी मंगळवारी रेखा आणि सचिन तेंडुलकर यांच्या गैरहजेरीवर राज्यसभेत चांगलाच हंगामा केला होता.

सचिन तेंडुलकर आणि रेखा यांना जर राज्यसभेत यायचं नाही तर त्यांनी सरळ खासदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली होती. मला हा मुद्दा वारंवार उचलावा लागतो आहे असं म्हणत त्यांनी आज पु्न्हा एकदा सचिन तेंडुलकर आणि रेखा यांच्या अनुपस्थितीवर त्यांनी बोट ठेवलं. या दोघांकडे जाहिराती करायला वेळ आहे इतर ठिकाणी जायला वेळ आहे, मग राज्यसभेत यायला वेळ का नाही? असा बोचरा सवाल अग्रवाल यांनी उपस्थित केला होता.

कला आणि क्रीडा या विभागातून नामवंत व्यक्तींना खासदार म्हणून राज्यसभेवर पाठवलं जातं मात्र रेखा आणि सचिन तेंडुलकर यांनी मागील तिन्ही अधिवेशनात हजेरी लावली नाही. ते राज्यसभेत आले आहेत अशी वेळ अत्यंत कमीवेळा आली आहे. खासदार म्हणून या दोघांनाही राज्यसभेवर येण्यात स्वारस्य नसेल तर त्यांनी सरळ खासदारकी सोडावी आणि घरी जावं, मात्र राज्यसभेची खासदारकी घ्यायची आणि तिथले नियम पाळायचे नाहीत याला काय अर्थ आहे? , असे अग्रवाल यांनी म्हटले होते.

हिवाळी अधिवेशान हे दोघे एकदा राज्यसभेत आले अर्थसंकल्प अधिवेशनात एकदा हजेरी लावली, तर आता सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात ते एकदाही आलेले नाहीत. जाहिराती करण्यासाठी या दोघांकडे वेळ आहे मात्र राज्यसभेत यायला वेळ नाही. त्यांना या अधिवेशनात आणि लोकांच्या प्रश्नात काहीही स्वारस्य नाही हेच त्यांची गैरहजेरी दाखवून देते आहे. याआधी देखील हा मुद्दा वारंवार मांडला गेला आहे मात्र त्यांना कोणीही सदनात येण्याबाबत खडसावत नाही. सचिन तेंडुलकर आणि रेखा यांना लोकांच्या प्रश्नांशी घेणंदेणं नाहीये त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी नरेश अग्रवाल यांनी केली होती. मात्र, त्यावेळी राज्यसभेचे उपसभापती जे. पी. कुरियन यांनी या दोघांनाही सुट्टी दिल्याचे स्पष्ट केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2017 2:10 pm

Web Title: sachin tendulkar attended rajya sabha proceedings today after mp naresh agrawal rised question about his presence
Next Stories
1 राज्यसभा निवडणूक: काँग्रेसला सुप्रीम कोर्टाचा झटका, ‘नोटा’वर स्थगितीस नकार
2 व्हर्जिन म्हणजे अविवाहित मुलगी; ‘त्या’ वादग्रस्त आदेशावर आरोग्यमंत्र्यांचे हास्यास्पद स्पष्टीकरण
3 मरण्यापूर्वी दुजाना म्हणाला, ‘अभिनंदन, तुम्ही मला पकडलं..पण सरेंडर करणार नाही’
Just Now!
X