अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर सोशल मीडियावर नवा वाद सुरू झाला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगनाच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवला. त्यानंतर संजय राऊत आणि कंगना यांच्यात सोशल मीडियावर खडाजंगी पाहायला मिळाली. या संपूर्ण वादादरम्यान एका मुलाखतीत संजय राऊतांनी कंगनाचा उल्लेख हरामखोर मुलगी असा केला. त्यांच्या या टिप्पणीवर अनेक कलाकारांनी आक्षेप घेत राऊतांनी कंगनाची माफी मागावी अशी मागणी केली. हा वाद संपतच नाही तोवर संजय राऊतांनी कंगनाला ‘नॉटी गर्ल’ असं म्हटलं.

अभिनेत्री कंगना रणौत म्हणजे नॉटी गर्ल आहे असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता केलं आहे. एवढंच नाही तर हरामखोर या शब्दाचा अर्थही त्यांनी उलगडून सांगितला आहे. हरामखोर म्हणजे मराठी भाषेत बेईमान असा होतो. ती नॉटी म्हणजे खट्याळ मुलगी आहे आणि बेईमान आहे. असं मला वाटतं.. असं आता संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

आणखी वाचा- कंगना तर ‘नॉटी गर्ल’, संजय राऊत यांचं वक्तव्य, उलगडला हरामखोर शब्दाचा अर्थ

‘हरामखोर मुलगी’ या टिप्पणीबाबत काय म्हणाले संजय राऊत?
एखाद्या विषयाचं राजकारण करायचं असेल तर कुठल्याही शब्दाचा कुठलाही अर्थ निघू शकतो. महाराष्ट्रात आम्ही जेव्हा हरामखोर असं म्हणतो तेव्हा आम्ही त्याचा अर्थ खट्याळ आणि बेईमान असा होता. त्याचा फार वेगळा अर्थ काढायची गरज नाही. जर कंगना रणौत कोलकाता, अहमदाबाद किंवा इतर कोणत्याही शहराबाबत असं बोलली असती तर त्या शहरांमधले लोक त्यांच्या भाषेत कंगनाला बोललेच असते तसंच मी बोललो असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.