27 February 2021

News Flash

राज्यसभेसाठी अखेर ‘आप’ला उमेदवार मिळाले; ‘या’ तिघांना पाठवणार वरिष्ठ सभागृहात

मनिष सिसोदिया यांनी जाहीर केली नावे

पत्रकार परिषदेत बोलताना मनिष सिसोदिया.

आम आदमी पार्टीला (आप) अखेर राज्यसभेसाठी उमेदवार मिळाले असून पक्षाचे नेते संजय सिंह, सुशील गुप्ता, एन. डी. गुप्ता या तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.


बुधवारी राज्यसभा उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी पक्षाची बैठक झाली. सुत्रांच्या माहितीनुसार, कुमार विश्वास आणि अशुतोष यांना या बैठकीसाठी बोलावण्यात आले नव्हते.

सिसोदिया यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितले की, उमेदवारांची निश्चिती करण्यासाठी विविध क्षेत्रातील १८ दिग्गज व्यक्तींच्या नावाचा विचार करण्यात आला होता. त्यानंतर या तिघांची अंतिम निवड करण्यात आली आहे.

संजय सिंह हे आपचे संयोजक आहेत. ते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांच्या आंदोलनासोबत पहिल्यापासूनच जोडलेले आहेत. तर नारायण दास गुप्ता आपचे दोन वर्षांपासून चार्टर्ड अकाऊंट म्हणून काम पाहतात. तर तिसरे उमेदवार सुनील गुप्ता एक ट्रस्ट चालवतात.

दिल्लीत राज्यसभेच्या ३ जागांसाठी १६ जानेवारीला निवडणूक होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2018 2:01 pm

Web Title: sanjay singh narayan das gupta sushil gupta and to be aam aadmi partys aap rajya sabha nominees announces manish sisodia
Next Stories
1 Bhima-Koregaon: पंतप्रधान मोदी ‘मौनीबाबा’, संसदेत त्यांनी बोललेच पाहिजे: मल्लिकार्जुन खरगे
2 चारा घोटाळा: लालूप्रसाद यादव यांच्या शिक्षेवर उद्या सुनावणी
3 राज्यसभेत आज तिहेरी तलाक विधेयक सादर होणार; सरकारपुढे मंजुरीचे आव्हान
Just Now!
X