जगभरातील सिनेरसिकांच्या मनात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत ‘जेम्स बाँड’ची भूमिका अजरामर करणारे सर शॉन कॉनेरी यांचे आज निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. कॉनेरी यांच्या निधनाच्या वृत्ताला त्यांच्या कुटुंबीयांनी दुजोरा दिला. कॉनेरी यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.
शॉन कॉनेरी यांनी त्यांच्या अभिनयाच्या प्रवासात अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. पण जेम्स बाँड म्हणून ते प्रेक्षकांच्या मनात कायमचं कोरले गेले. त्यांचा अभिनय कायमचं प्रेक्षकांच्या स्मरणात राहिल. त्यांच्या सिनेकारकीर्दीत त्यांना ऑस्कर पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. त्याचबरोबर तीन गोल्डन ग्लोब आणि दोन बाफ्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
James Bond actor Sir Sean Connery dies at the age of 90: UK media pic.twitter.com/9rVjMBWxut
— ANI (@ANI) October 31, 2020
शॉन कॉनेरी यांनी इंडियाना जोन्स, द हंट फॉर रेड ऑक्टोबर आणि लास्ट क्रूसेड अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 31, 2020 6:55 pm