स्वित्र्झलडसमवेत माहितीची स्वयंचलित देवाणघेवाण करण्याचा करार भारताने केला असून त्याअंतर्गत भारतीय नागरिक आणि कंपन्यांच्या स्विस बँकेतील खात्यांचा सविस्तर तपशील असलेला दुसरा संच भारताला प्राप्त झाला आहे.

भारताला स्वित्झर्लंडकडून माहितीच्या सविस्तर तपशिलाचा पहिला संच सप्टेंबर २०१९ मध्ये मिळाला होता. स्विस अधिकाऱ्यांनी यापूर्वीच १०० हून अधिक भारतीय नागरिक आणि कंपन्यांची माहिती दिली असून त्यामध्ये करचुकवेगिरीसह आर्थिक गैरव्यवहारांचा तपशील आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यापैकी काही प्रकरणे भारतीय नागरिकांनी पनामा, ब्रिटिश व्हर्जिन बेटे आणि केमन बेटे येथे स्थापन केलेल्या कंपन्यांबाबतची आहेत.  यात बहुसंख्य उद्योगपती, राजकीय नेते यांचा समावेश आहे.