करोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाचा नारा दिला आहे. मात्र या नाऱ्यावर काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांनी टीका केली आहे. आत्मनिर्भर भारत अभियान हे दुसरं तिसरं काहीही नसून मेक इन इंडियाचं नवं नाव आहे अशी टीका थरुर यांनी केली आहे.

यासंदर्भात थरुर यांनी एक ट्विट केला आहे. त्यात ते म्हणतात की “नए नाम से वही पुराना शेर बेच गए सपनों के वो फिर से ढ़ेरों ढ़ेर बेच गए…” या ओळी लिहित थरुर यांनी एक फोटोही ट्विट केला आहे. ज्या फोटोत मेक इन इंडियाचं चिन्ह असलेला सिंह दिसतो आहे. #MakeInIndia is now आत्मनिर्भर भारत, कुछ और भी नया था क्या? असा प्रश्न एक माणूस विचारताना दिसतो आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशवासीयांशी व्हिडीओ संवाद साधला. यामध्ये त्यांनी २० लाख कोटींचं पॅकेज अर्थव्यवस्थेचं चक्र पुन्हा सुरु करण्यासाठी जाहीर केलं. तसंच या पॅकेजचा उपयोग हा शेतकरी, कष्टकरी, लघु आणि मध्यम उद्योजक या सगळ्यांनाच होईल असंही म्हटलं आहे. मात्र यावेळी आत्मनिर्भर भारत हा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. या नाऱ्याचीच आता शशी थरुर यांनी खिल्ली उडवली आहे. तसंच आत्मनिर्भर भारत हे दुसरं तिसरं काहीही नाही मेक इन इंडियाचं बदलेलं नाव आहे या आशयाचं खोचक ट्विटही केलं आहे.