News Flash

तृतीयपंथींची छेड काढल्यास होणार फौजदारी गुन्हा

दिल्ली पोलिसांत गुन्हा

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

तुम्ही जर एखाद्या तृतीयपंथी व्यक्तीची छेड काढली, तर त्याच्या तक्रारीवरून तुमच्या फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो. असाच एक गुन्हा दिल्ली पोलिसांनी नोंदविला आहे. भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४-ए नुसार हा गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. देशात अशा प्रकारे नोंदलेला हा पहिलाच गुन्हा असावा.

महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एका तृतीयपंथी व्यक्तीने महाविद्यालयात मुले आपली छेड काढत असल्याची तक्रार दिल्लीतील राजोरीगार्डन पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र, हा गुन्हा ठरत नाही. ही तक्रार दिवाणी असल्याचे सांगून पोलिसांनी तसा गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. जन्मत: पुरूष असलेल्या मात्र, स्वत:ला स्त्री समजणाºया या व्यक्तीने याविरूद्ध दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. फक्त लिंगाच्या आधारावर पोलिसांनी आपल्याला वाईट वागणूक देणे ही मुलभूत हक्कांची पायमल्ली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने तृतीयपंथींना स्वतंत्र तिसरे लिंग म्हणून मान्यता दिली आहे. तसेच त्यांना आपली लैंगिक ओळख स्वत: ठरविण्याचा अधिकार दिल्यानंतर पोलिसांची ही कृती पूर्णपणे कायद्याविरूद्ध आहे, असे तक्रारकर्त्या व्यक्तीने याचिकेत म्हटले होते. या याचिकेवर न्या. सिद्धार्थ मृदुल व न्या. संगिता धिंग्रा सेहगल यांच्या खंडपीठाने नोटीस काढूनही केंद्र सरकारने कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. दरम्यान, याचिकाकर्तीचे म्हणणे मान्य करून दिल्ली पोलिसांनी पोलीस आयुक्तांच्या निर्देशांनुसार संबंधितांवर कलम ३५४-ए अन्वये गुन्हा नोंदविला. तसेच तपासही सुरु करण्यात आला आहे. याची नोंद घेत न्यायालयाने याचिका निकाली काढली.

कायद्यात नवी कलमाचा समावेश
दिल्लीतील ‘निर्भया’ बलात्कार व खून प्रकरणांनंतर दंड विधानात ज्या दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. यात ३५४-ए या नवीन कलमाचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार पुरुषाने स्त्रीशी सलगी करणे, तिची छेड काढणे, तिच्याकडे लैंगिक सुखाची मागणी करणे किंवा तिच्याविषयी अश्लिल शेरेबाजी करणे हाही लैंगिक अत्याचाराचा गुन्हा ठरविण्यात आला. आता या प्रकरणाने या कलमाची व्याप्ती वाढली असून महिलांप्रमाणेच तृतीयपंथी व्यक्तीची छेड काढणे यालाही हेच कलम लागू झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2018 8:59 pm

Web Title: sexual harassment against transgenders now a penal offence says delhi hc
Next Stories
1 केदारनाथ प्रलयात बेपत्ता झालेली तरुणी पाच वर्षांनी परतली घरी, कुटुंबीयांना अश्रू अनावर
2 फेसबुकवरुन जमलेल्या प्रेमासाठी मुलीने केली आईची हत्या
3 बागेत नमाज पठण केलात तर कारवाई करु, नोएडा पोलिसांचा इशारा
Just Now!
X