दिल्लीत काँग्रेसच्या टेकूवर सत्तास्थानी विराजलेले ‘विरोधक’ आणि देशातील मुख्य विरोधक भाजप अशा दोघांनाही एकाच तीरात लक्ष्य करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला़. केजरीवाल यांनी राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेला गवसणी घालण्यासाठी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला़  भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार मोदी मात्र गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाच्या खूर्चीला अद्याप चिकटून आहेत़
केजरीवालांनी राजीनामा देऊन स्वत:ला नैतिकस्तरावर सिद्ध केले आह़े  मोदी पदाला चिकटून आहेत, अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस शकील अहमद यांनी ट्विप्पणीद्वारे केली आह़े