तणावपूर्ण निवडणुकीत विजयी झालेल्या अवामी लीगच्या नेत्या शेख हसिना तिसऱ्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्या आहेत. रविवारी त्यांनी आपल्या ४५ मंत्र्यांसह पदाची शपथ घेतली.
बांगलादेशचे अध्यक्ष अब्दुल हमीद यांनी बंगभवन अध्यक्षीय पॅलेसमध्ये शेख हसिना यांना पदाची शपथ दिली. या वेळी अनेक अधिकारी, परदेशी राजदूत आदी उपस्थित होते. अवामी लीगनंतर सर्वाधिक जागा मिळवलेल्या जतिया पक्षाने सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्याही काही सदस्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. गेल्या दोन दशकात हसिना यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. बांगलादेशाच्या सार्वत्रिक निवडणुकीत अवामी लिगने ३०० पैकी २३१ जागा मिळवल्या.