08 July 2020

News Flash

इराणबाबत बराक ओबामा यांनी नवा सूर आळविल्याने आशा पल्लवित – रौहानी

संयुक्त राष्ट्रसंघात केलेल्या भाषणात अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी नवा सूर आळविल्यामुळे इराण आणि अमेरिका

| September 29, 2013 02:19 am

संयुक्त राष्ट्रसंघात केलेल्या भाषणात अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी नवा सूर आळविल्यामुळे इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव दूर होण्यास मदत होईल, असा आशावाद इराणचे नवे अध्यक्ष हसन रौहानी यांनी व्यक्त केला आहे. अलीकडेच झालेल्या निवडणुकीनंतर आपल्याकडे इराणचे अध्यक्षपद आले, त्यामुळे नवे वातावरण तयार झाले असल्याने पाश्चिमात्य देशांशी उत्तम संबंध ठेवण्यासाठी त्याचा लाभ होईल, असेही रौहानी यांनी म्हटले आहे. ओबामा यांची भेट अद्याप आपण घेतलेली नाही. तथापि, अमेरिका आणि त्यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील मित्र यांच्याशी झालेल्या चर्चेतून चित्र आशादायी असल्याचे स्पष्ट झाले आहे, असेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2013 2:19 am

Web Title: shoe show mixed reception for rouhani after obama call
टॅग Barack Obama
Next Stories
1 चीनमधून ९२ अपहृत मुलांची सुटका
2 हवामान बदल : तोंड देण्यास भारत, अमेरिकेचा गट
3 पाकिस्तानात पुन्हा भूकंप
Just Now!
X