News Flash

शत्रुघ्न सिन्हा यांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बिहारमधील जाहीर सभा रद्द होणे हा नकारात्मक संदेश असल्याचेही सिन्हा म्हणाले.

बिहार प्रदेश भाजपचे काही हुकूमशाही वृत्तीचे नेते पक्षात गोंधळाची आणि अनिष्ट स्थिती निर्माण करीत असल्याचा आरोप भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी शनिवारी येथे केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बिहारमधील जाहीर सभा रद्द होणे हा नकारात्मक संदेश असल्याचेही सिन्हा म्हणाले. नरेंद्र मोदी हे पक्षाचे प्रभावी प्रचारक असून त्यांना आपल्या जाहीर सभा रद्द कराव्या लागल्याने नकारात्मक संदेश गेला असल्याचे सिन्हा यांनी ट्वीट केले आहे. सिन्हा यांचे नाव प्रचारकांच्या यादीत असूनही त्यांनी बिहारमध्ये अद्याप एकही सभा घेतलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2015 2:01 am

Web Title: shtrughna sinha bihar statement
टॅग : Bihar
Next Stories
1 कठोर आर्थिक सुधारणा राबवल्यास १५ वर्षांत जगाचा दारिद्रय़ाला रामराम
2 परदेशापेक्षा देशात काळा पैसा जास्त : पसायत
3 सौदी अरेबियात इसिस हल्लेखोराचा गोळीबार, ५ ठार
Just Now!
X