News Flash

देशात करोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ; गेल्या २४ तासांत ९५ हजारांपेक्षा अधिक रूग्णांची नोंद

गेल्या २४ तासात देशात ९५ हजार ७३५ नवे करोनाबाधित रुग्ण

संग्रहित छायाचित्र

भारतातील करोनाबाधित रुग्णसंख्येने ४४ लाखांचा टप्पा पार केला आहे. गेल्या २४ तासात देशात ९५ हजार ७३५ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ११७२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यासोबत देशातील एकूण करोनाबाधित रुग्णसंख्या ४४ लाख ६५ हजार ८६४ इतकी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

यामध्ये ९ लाख १९ हजार १८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून ३४ लाख ७१ हजार ७८४ जणांना उपचारानंतर घरी सोडवण्यात आलं आहे. दरम्यान करोनामुळे आतापर्यंत ७५ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे राज्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून बुधवारी २३ हजार ८१६ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १३ हजार ९०६ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून २४ तासांत ३२५ करोनाबाधितांचा मृत्यू झाला. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आालेल्या ४८ लाख ८३ हजार नमुन्यांपैकी ९ लाख ६७ हजार ३४९ (१९.८१ टक्के) जण करोनाबाधित असल्याचे आढळून आले आहेत, तर आतापर्यंत ६ लाख ८६ हजार ४६२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.९६ टक्यांवर पोहोचले आहे. राज्यात १६ लाख ११ हजार २८० व्यक्ती घरगुती अलगीकरणामध्ये, तर ३७,६४४ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात सर्वाधिक ६५ हजार ३६१ करोनाबाधित पुणे जिल्ह्य़ात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2020 10:01 am

Web Title: single day spike of 95735 new cases and 1172 deaths reported in india in the last 24 hours sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “कंगनाला वेळ का नाही दिला विचारणाऱ्या वृत्तवाहिन्यांनी लॉकडाउनआधी मोदींनी भारतीयांना वेळ का नाही दिला हे विचारलं नाही”
2 करोना लसीच्या चाचणीबाबत नोटीस मिळाल्यानंतर सीरमनं दिलं उत्तर; म्हणाले…
3 अफगाण उपाध्यक्षांच्या वाहन ताफ्यावर हल्ला, १० ठार
Just Now!
X