21 October 2020

News Flash

प्रियकराबद्दल आई-वडिलांना सांगितले म्हणून बहिणीने चार वर्षाच्या भावाची केली हत्या

सख्ख्या भावाची हत्या केल्या प्रकरणी लुधियाना पोलिसांनी रेणू कानौजिया (१९) या तरुणीला अटक केली आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

सख्ख्या भावाची हत्या केल्या प्रकरणी लुधियाना पोलिसांनी रेणू कानौजिया (१९) या तरुणीला अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी एका गोणीमध्ये अंश कानौजियाचा मृतदेह सापडला होता. अंश अवघ्या चार वर्षांचा होता. रेणूचे बाहेर प्रेम प्रकरण सुरु होते. अंशने काही दिवसांपूर्वी आई-वडिलांना रेणूच्या प्रियकराबद्दल सांगितल्याने रेणू त्याच्यावर नाराज होती.

चौकशीमध्ये तिने भावाच्या हत्येची कबुली दिली. १५ दिवसांपूर्वीच आपण भावाच्या हत्येचा कट आखल्याचे तिने सांगितले. सहा ऑक्टोंबरला आई-वडिल घरी नसताना तिने अंशची गळा आवळून हत्या केली. भावाची हत्या केली म्हणून रेणूला कुठलीही खंत नाहीय.

आपल्या प्रेमसंबंधांमध्ये भाऊ अडथळा ठरत होता असे तिने सांगितले. भाऊ प्रत्येक ठिकाणी आपल्या मागे यायचा. एकदिवस ती तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी जात असताना अंश तिच्या मागे आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2018 6:19 pm

Web Title: sister killed brother for telling parents about her boyfriend
Next Stories
1 आंतराराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे निघालेल्या यानाचं इमर्जन्सी लॅन्डिग
2 गंगा नदीसाठी १११ दिवसांपासून उपोषण करणाऱ्या जी.डी. अग्रवाल यांचे निधन
3 आधी ब्रिटिशांनी आपले विभाजन केले आता आपणही तेच करतोय, आनंद महिंद्रा उद्विग्न
Just Now!
X