काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी वैद्यकीय तपासणीसाठी सोमवारी दुपारी अमेरिकेला रवाना झाल्या आहेत़  त्यांच्यासोबत मुलगी प्रियांकाही आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली़ ६६ वर्षीय सोनिया यांच्यावर ५ ऑगस्ट २०११ रोजी अमेरिकेत शस्त्रक्रिया करण्यात आली होती़  कोणत्या आजारासाठी ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती ते जाहीर करण्यात आले नव्हत़े  त्यानंतर गेल्या सप्टेंबर व या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्या तपासणीसाठी अमेरिकेत गेल्या होत्या़
गेल्या सोमवारी अन्न सुरक्षा कायदा संमत होण्याच्या अंतिम टप्प्यात लोकसभेत चर्चेला आलेला असताना सोनिया यांची प्रकृती सभागृहातच बिघडली होती़  त्यांच्या छातीत दुखू लागले होते आणि गुदमरल्यासारखे होऊ लागले होत़े  त्यानंतर त्यांना तातडीने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होत़े  तेथे सुमारे पाच तास त्यांच्या विविध चाचण्या केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होत़े
समाजवादाची उबळ
सोनिया गांधी यांच्यावर ऑगस्ट २०११ मध्ये अमेरिकेत शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्याबाबतही सविस्तरपणे कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. यावर्षी फेब्रुवारीमध्येही त्या अमेरिकेत गेल्या होत्या. मात्र, त्या दौऱयाचे कारण कळाले नव्हते.
सोनिया गांधी यांना गेल्या सोमवारी रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने दिल्लीतील अखिल भारतीय आय़ुर्विज्ञान संस्थेमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारांनंतर त्याच दिवशी रात्री उशीरा त्यांना घरी सोडण्यात आले.
महिलांवरील अत्याचार थांबलेच पाहिजेत – सोनिया गांधी