News Flash

सौरव गांगुलीच्या परिवारातील व्यक्तींना करोनाची लागण

आरोग्य विभागाची माहिती, खासगी रुग्णालयात उपचार सुरु

भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याच्या परिवारातील सदस्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. सौरव गांगुलीचा मोठा भाऊ स्नेहाशिष गांगुलीची पत्नी आणि तिच्या आई-बाबांना करोनाची लागण झाल्याची माहिती, पश्चिम बंगालच्या आरोग्य विभागाने दिली आहे. स्नेहाशिष गांगुली बंगाल क्रिकेट असोसिएशनमध्ये सचिव या पदावर काम करतो.

स्नेहाशिष यांच्या घरी काम करणारा व्यक्ती करोना पॉजिटीव्ह आढळला होता. यानंतर घरातल्या लोकांची चाचणी केली असता, स्नेहाशिष याची पत्नी व सासु-सासऱ्यांचा अहवाल पॉजिटीव्ह आढळला आहे. स्नेहाशिष याचा अहवाल मात्र निगेटीव्ह आला आहे. स्नेहाशिषने रणजी क्रिकेट सामन्यात बंगालचं प्रतिनिधीत्व केलं आहे. सर्व रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2020 1:39 pm

Web Title: sourav gangulys kin test positive for covid 19 psd 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जाडेजा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक – गौतम गंभीर
2 2011 WC : माजी श्रीलंकन क्रीडामंत्र्यांचा आणखी एक आरोप, अंतिम सामन्यात लंकेच्या संघात ऐनवेळी बदल
3 चिनी कंपनीकडून स्पॉन्सरशीप, IPL गव्हर्निंग काऊन्सिल करारावर विचार करणार
Just Now!
X