उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी बुधवारी म्हटले की, त्यांचा पक्ष धर्म, जात आणि पंथाचा विचार न करता प्रत्येकाच्या कल्याणासाठी काम करतो. लखनौमध्ये टाइम्स नाऊ नवभारत नवनिर्माण मंच कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, कोणत्याही पक्षाची भारतीय जनता पक्षाशी (भाजप) स्पर्धा करण्याची क्षमता नाही.

“कोणत्याही पक्षामध्ये भारतीय जनता पक्षाशी स्पर्धा करण्याची क्षमता नाही. फक्त तोच पक्ष आम्हाला कठोर स्पर्धा देऊ शकतो जो जातिवाद, घराणेशाही, धर्माचे राजकारण करत नाही आणि जे फक्त उत्तर प्रदेशच्या विकासासाठी आणि तरुणांच्या कल्याणासाठी देखील कार्य करते,”असं ते म्हणाले. त्यांनी समाजवादी पार्टीवर मुस्लिम समाजाला खूश करण्यासाठी व्होट बँकेचे राजकारण केल्याचा आरोपही केला.

आणखी वाचा- PM निवासस्थानासाठी हटवली संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांची कार्यालये; ७००० जण होणार शिफ्ट

ते म्हणाले की, मायावतींच्या बहुजन समाज पक्षाला कमकुवत पक्ष मानू नये आणि पुढील वर्षीच्या उत्तरप्रदेश निवडणुकांमध्ये तो समाजवादी पार्टीपेक्षा अधिक मजबूत होईल. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केलेल्या त्यांचा पक्ष आगामी राज्य निवडणुकीत ४०० जागा जिंकेल या दाव्याबद्दल विचारले असता, सिंह यांनी त्यांच्यावर एक कटाक्ष टाकला आणि विचारले की त्यांना इतक्या जागा कुठून मिळतील?